देवेंद्र फडणवीस काय म्हणाले…
काल MPSC अध्यक्षांना मी विनंती केली होती. या विनंतीला मान देत विद्यार्थी हिताचा निर्णय घेतल्याबद्दल मी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आणि सर्व सदस्य यांचा अत्यंत आभारी आहे.
विद्यार्थ्यांची अजून एक मागणी
लोकसेवा आयोगाने पुढे ढकलण्यात आलेल्या परिक्षेत कृषी विभागाच्या २५८ जागांचा देखील समावेश करावा. या २५८ जागांसाठी परिक्षा घेण्याचे नोटीफिकेशन काढावे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा विद्यार्थ्यांचा निर्णय आहे. कृषी विभागाच्या जागांबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार आहे.
मी स्वतः आंदोलनात सहभाी होईल
दरम्यान, या आंदोलनात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार सहभागी झाले होते. तर शरद पवार यांनीही राज्य सरकारला इशारा दिला होता. ”पुण्यात MPSCच्या विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या आंदोलनासंदर्भात विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणे सरकारचे कर्तव्य आहे. परंतु सत्ताधारी याला गांभीर्याने घेताना दिसत नाही. उद्यापर्यंत यावर सरकारने योग्य भूमिका स्पष्ट केली नाही. तर मी स्वतः आंदोलनात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानात उतरेन”, असा इशारा शरद पवार यांनी दिला होता.