बदलापूर अत्याचार घटना; आरोपी अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड, ग्रामस्थांना घरात सापडली…

ठाणे (बदलापूर) : बदलापूरच्या नामांकित शाळेत घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. बदलापुरमधील नागिरक आणि पालक चांगलेच भडकले आहेत. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी संपूर्ण बदलापूर रस्त्यावर उतरलं होतं. दरम्यान, अक्षय शिंदे याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. सध्या पोलिसांकडून अक्षय शिंदे याची कसून चौकशी सुरु झाली आहे.काल बुधवारी बदलापूरमध्ये अक्षय शिंदे राहत असलेल्या खरवई गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले. अक्षय शिंदे खरवईपासून काही अंतरावर असलेल्या एका चाळीत राहतो. गावातील ग्रामस्थांनी बुधवारी त्याच्या घरात घुसून कुटुंबीयांना बाहेर काढलं आणि घरातील सामानाची तोडफोड केली. त्यानंतर गावकऱ्यांनी अक्षय शिंदे याच्या कुटुंबीयांना घरातून हाकलून लावत गाव सोडण्यास भाग पाडले.
Kolkata Doctor: डोळ्यात ना लाज ना चेहऱ्यावर पश्चाताप; संजयच्या डोक्यात राक्षस, विकृत मानसिकता, चिड आणणारा अहवाल

अक्षयच्या घरात सापडली खेळणी

दरम्यान, आता एक मोठी माहिती समोर आली आहे. ग्रामस्थांनी अक्षय शिंदे याच्या घरावर हल्ला चढवला तेव्हा त्याच्या घरात लहान मुलांची खेळणी आढळली आहेत. ही खेळणी नेमकी आली कुठून? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. याबाबत एसआयटी पथकाकडून तपास केला जाण्याची शक्यता आहे.

अक्षय शिंदे याचे कुटुंब मूळचे कर्नाटकातील गुलबर्गा या गावातील आहे. अक्षयचा जन्म खरवई गावात झाला होता. तो याठिकाणी असणाऱ्या एका चाळीत आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होता. त्याच्या कुटुंबात आई-वडील आणि एक भाऊ असे तिघेजण आहेत. अक्षयच्या कृत्यामुळे राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तो दहावीपर्यंत शिकला होता. यापूर्वी तो एका इमारतीचा सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. त्यानंतर १ ऑगस्टपासून तो बदलापूरच्या शाळेत सफाई कर्मचारी म्हणून कामाला लागला होता. त्याने दोन चिमुरड्या मुलींना स्वच्छतागृहात नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.

अकोल्यात सहा चिमुकलींवर अत्याचार

दरम्यान, अकोल्यातही सहा चिमुकल्यांवर एका शिक्षकाने अत्याचार केला. या विरोधात आंदोलने सुरू आहेत. आज प्रहार जनशक्ती पक्षाने अकोल्यातील धिंग्रा चौकातील उड्डाण पुलावरून बलात्कारी नराधमाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला लटकवून फाशी देत आंदोलन केलं. घोषणाबाजी करत अशा नराधमांना फाशी देण्याची मागणी सरकारकडे केली आहे. यावेळी चिमुकल्या मुलींसह युवकांनी मोठ्या संख्येत हजेरी लावली होती.

Source link

akshay shinde house vandalizeakshay shinde latest update newsbadlapur crime newstoys in akshay shindes houseअक्षय शिंदे घर तोडफोडअक्षय शिंदे लेटेस्ट अपडेट बातम्याअक्षय शिंदेच्या घरात खेळणीबदलापूर क्राइम बातम्या
Comments (0)
Add Comment