महायुती आणि माझा विषय संपला, समरजितसिंह घाटगे ठाम; हसन मुश्रीफांना पाडायचा चंग

नयन यादवाड, कोल्हापूर : भाजप नेते समरजीतसिंह घाटगे पक्षाला सोडचिठ्ठी देऊन ‘तुतारी’ वाजवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. समरजीतसिंह हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. महायुतीत कागल विधानसभा मतदारसंघ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची शक्यता आहे. विद्यमान आमदार आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनाच पुन्हा तिकीट मिळण्याचे संकेत आहेत. त्यामुळे नाराज समरजीतसिंह घाटगे यांनी पक्षांतराचा पर्याय निवडल्याचं बोललं जातं.

समरजीतसिंह घाटगे यांची समजूत काढण्यासाठी भाजपचे नेते त्यांच्या घरी गेले होते. भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक यांच्यासह इतर नेते समरजीत सिंह घाटगे यांच्या भेटीला गेले होते. काल रात्री उशिरा कोल्हापुरातील निवासस्थानी समरजीतसिंह घाटगे यांची भाजप नेत्यांनी भेट घेतली.
Uddhav Thackeray on Eknath Shinde : बदलापूरची घटना एकनाथ शिंदेंना मान्य आहे का? यामागे राजकारण वाटणारे मुख्यमंत्री विकृत मानसिकतेचे, ठाकरे कडाडले
समरजीतसिंह घाटगे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याबाबत घेतलेल्या निर्णयासंदर्भात भाजप नेत्यांची समरजीत सिंह घाटगे यांच्याशी चर्चा झाली. समरजीत सिंह घाटगे यांची समजूत काढून आज होणाऱ्या महायुतीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासंदर्भात विनंती केली. परंतु महायुती आणि माझा विषय संपला म्हणत समरजीत सिंह घाटगे आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये झालेली चर्चा नकारात्मक ठरल्याचं समोर आलं आहे.
Pune Cantonment : ठाकरे गटातून काँग्रेसमध्ये प्रवेश, आंबेडकरी चळवळ कार्यकर्ता विधानसभेला, पुण्यात मोठी घडामोड
हसन मुश्रीफ हे २००९ पासून सलग तीन वेळा कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत मुश्रीफ यांना १ लाख १६ हजार ४३६ मतं मिळाली होती. तर अपक्ष लढलेल्या घाटगेंना ८८ हजार ३०३ मतं पडली होती. यंदा मतदारसंघातील वातावरण मुश्रीफ यांच्यासाठी प्रतिकूल असल्याची चर्चा आहे. त्यातच कागल विधानसभा मतदारसंघ येत असलेल्या कोल्हापूर लोकसभेत महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज खासदार आहेत.

राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीमुळे मुश्रीफांचे कार्यकर्ते विभागले गेले आहेत. याशिवाय घाटगेंच्या पाठीशी भाजप कार्यकर्त्यांचं बळ लागू शकतं. तर घाटगे मविआचे उमेदवार झाल्यास ठाकरे गट आणि काँग्रेसची ताकद मिळेल. त्या तुलनेत शिंदेंची शिवसेना आणि दादांची राष्ट्रवादी यांच्या महायुतीची शक्ती तोकडी पडू शकते. हसन मुश्रीफ यांना पाडायचंच, हा चंग घाटगेंनी बांधला असल्याने त्यांच्यावर कठीण वेळ ओढवू शकते.

Source link

maharashtra assembly electionMaharashtra politicsVidhan Sabha Nivadnukकागल विधानसभा मतदारसंघकोल्हापूर राजकारणमहाविकास आघाडीसमरजितसिंह घाटगे राष्ट्रवादीसमरजितसिंह घाटगे विरुद्ध हसन मुश्रीफ
Comments (0)
Add Comment