मुंबईतील ईडी कार्यालयावर काँग्रेसचा धडक मोर्चा

मुंबई : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या विरोधात कॉंग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे. गौतम अदानी यांच्या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कॉंग्रेसने ईडीकडे केली आहे. खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात मुंबईतील ईडी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे.

घोटाळ्याची चौकशी व्हावी

उद्योगपती गौतम अदानी यांनी केलेल्या घोटाळ्याची चौकशी व्हावी. हि आंदोलन करणाऱ्या लोकांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठीच मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चावेळी अनेक कार्यकर्ते आक्रमक झाले होते. मोर्चावर नियंत्रण मिळवण्यासाठी ईडी कार्यालयाबाहेर मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्याचबरोबर पोलिसांकडून मोठ्याप्रमाणात धरपकड सुरू आहे.

खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात मोर्चा

कॉंग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला आहे. अदानी देशाची लूट करत आहे. अशा प्रकारचे बॅनर्स दाखवून कार्यकर्त्यांनी अदानी यांचा निषेध केला आहे. ‘सेबीने दिली सूट अदानी करतोय लूट’ असे बॅनर दाखण्यात आले. त्यामुळे ईडी कार्यालयाबाहेर मोठा गोंधळ उडाला आहे.
Akshay Shinde: बदलापूर प्रकरणात नवा ट्विस्ट; डोक्याने कमजोर, औषध सुरु, आरोपी अक्षयच्या आईने काय-काय सांगितलं?

कॉंग्रेसकडून जंतरमंतर मैदानावर आंदोलन

हिंडनबर्ग अहवालाविरोधात कॉंग्रेसने जंतरमंतर मैदानावर आंदोलन केले आहे. गौतम अदानी आणि सेबीच्या प्रमख निर्मला बूची यांच्यातील मनी लाँड्रिंग प्रकरणातील माहिती हिंडनबर्ग संस्थेच्या अहवालाने समोर आणली होती. सेबीच्या प्रमुखांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. याच आनुषंगाने कॉंग्रेसकडून मुंबईत आंदोलन करण्यात आले आहे.

हिंडेनबर्गचा अदानींवर मोठे आरोप

गेल्या वर्षाच्या सुरुवातीला हिंडेनबर्गने आपल्या एका अहवालाने उद्योग विश्वच नाही तर भारतीय शेअर बाजारालाही मोठे हादरे दिले होते. जानेवारी २०२३ मध्ये हिंडनबर्गने अदानी समूहावर आर्थिक अनियमिततेचा आरोप करत एक अहवाल प्रकाशित केला, ज्यामुळे कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत मोठी पडझड झाली होती. हिंडेनबर्ग अहवालात समुहाद्वारे स्टॉकच्या किंमतीत फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला. शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालातील आरोपांशी संबंधित असून यामध्ये अदानींनी त्यांच्या समभागांच्या किमती वाढवल्याचा आरोप करण्यात आला असून अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर तब्बल १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या अदानी समूहाच्या विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.

Source link

adani hindenburg researchadani scamadani scams latest updateshindenburg reportअदानी ग्रुपकॉंग्रेसकॉंग्रेस आंदोलनकॉंग्रेस मोर्चागौतम अदानी
Comments (0)
Add Comment