success story : अर्धापूरची केळी साता समुद्रापार; शेतकऱ्याला मिळाले लाखो रुपयांचे उत्पन्न

अर्जुन राठोड , नांदेड : ‘शेती’ व्यवसाय म्हंटलं की लोक लगेच नको म्हणतात. अगदी शेतकरी आई – वडील देखील आपल्या मुलाला शेती करू नका असं सांगत असतात. शेतीमालाला न मिळणारा भाव, औषधांचा खर्च, दुष्काळ या सारख्या समस्यांमुळे शेती करायला सध्याची तरुणाई तयार होत नाही. परंतु आता याच शेतीमधून नांदेडच्या शेतकऱ्याने केळीची शेती करून लाखोंची कमाई केली आहे.

माणिक देशमुख असं शेतकऱ्याचे नाव असून ते नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील रहिवाशी आहेत. माणिक देशमुख यांना एकूण २१ एकर शेती आहे. त्यातील चार एकर मध्ये दरवर्षी केळीची लागवड करत असतात. साधारणतः लागवडी पासून ते तोडणीपर्यंत त्यांना अडीच लाख रुपये इतकं खर्च येतो. त्यातून त्यांना वर्षाकाठी १५ ते २० लाख रुपयाचे उत्पन्न देखील मिळत आहे. विशेष म्हणजे इतर देशातील इतर राज्या प्रमाणे विदेशात ही केळीला मागणी होतं आहे. देशातील दिल्ली, हैदराबाद, चंदीगढ, पुणे, मुंबई, श्रीनगर यासह विदेशातील इराण, इराक, ओमेन, दुबई, कतार, सौदी अरेबिया या देशात ही नांदेडच्या केळीचा गोववा वाढला आहे. दरवर्षी लाखो टन केळीची निर्यात होतं असते.

20 लाखांचे उत्पन्न मिळवले

खाण्यासाठी चविष्ट आणि टिकाऊ असणाऱ्या अर्धापूरी केळीला देशासह विदेशातही आता मागणी वाढू लागली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावरून पॅकींग करून मुंबईच्या समुद्रमार्गे विदेशात निर्यात होतेय. दुबई, इराण, इराक यासह इतर आखाती देशात मोठी निर्यात वाढली आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यालाही अच्छे दिन आले असून लाखो रुपयांचा नफा यंदा शेतकऱ्याच्या पदरात पडत आहे. माणिक देशमुख यांनी आपल्या चार एकरमध्ये २० लाख रुपयाचे उत्पन्न मिळवले आहे.

अर्धापूर तालुका केळीसाठी प्रसिद्ध

अर्धापूर तालुका हा केळी, ऊस आणि हळद लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. अर्धापूर प्रमाणे नांदेड, मुदखेड, हदगाव, भोकर यासह इतर तालुक्यात ही केळी लागवड केळी जातं आहे. अर्धापूरची केळी संपूर्ण देशभर पाठवली जाते. गत वर्षी १५०० रुपये प्रति क्विंटल केळीचा भाव होता. यंदा मात्र २२०० ते २३०० पर्यंत प्रति क्विंटल दर मिळत आहे. मे ते जुलै दरम्यान गत वर्षी लागवड झाल्यामुळे या हंगामातच मोठ्या प्रमाणात काढणी झाली. ऑगस्टनंतर देश-विदेशात दोन्ही ठिकाणी मागणी वाढली. येणाऱ्या पुढील काळातही सण-समारंभ असल्यामुळे केळीच्या दरात वाढ होईल. अशी अपॆक्षा माणिक देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

Source link

nanded newsNanded TOPICsuccess storysuccess story in marathisuccess story newsनांदेड ताज्या बातम्यानांदेड बातमीशेतकरी यशोगाथाशेती न्यूजशेतीविषयक बातम्या
Comments (0)
Add Comment