के. पी. पाटील महायुतीला धक्का देण्याच्या तयारीत?

कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापुरात मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्याचबरोबर नाराजी नाट्य मोठ्या प्रमाणात सध्या घडत असून याचा सर्वाधिक प्रभाव महायुतीमध्ये दिसून येत आहे. निवडणुकीच्या तोंडावर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ महाराष्ट्रात राबवण्यात आली असून आज कोल्हापूरात महायुतीकडून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तपोवन मैदानावर लाभार्थी मेळावा पार पडला. मात्र या कार्यक्रमाला महायुतीचे नेते समरजीतसिंह घाटगे, कालच भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले राहुल देसाई, अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले ए. वाय. पाटील यांची अनुपस्थिती होती. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार के.पी. पाटील हे ही अनुपस्थिती दर्शवल्याने आता के.पी. पाटील हे देखील मार्ग महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

समरजीत सिंह घाटगे यांची सभेकडे पाठ

कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे आज हजारो महिलांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा पार पडला. या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री आणि महायुतीचे जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र या प्रमुख नेत्यांमध्ये चार चेहऱ्यानी आज मेळाव्याकडे पाठ फिरवली. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री कोल्हापुरात येण्याचे एक दिवस आधीच म्हणजे काल जिल्ह्यात महायुतीला तीन मोठे धक्के बसले. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय असलेले समरजीत सिंह घाटगे, भाजप जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिलेले राहुल देसाई आणि अजित पवार गटाचे प्रदेशउपाध्यक्ष आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलेले ए. वाय. पाटील यांचा समावेश होता. हे तिघेही आजच्या मेळाव्याला उपस्थित राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र तिघांनीही या मेळाव्याकडे पाठ फिरवली असून महायुतीशी त्यांनी काडीमोड घेतल्याचे आता स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे काल रात्री उशिरा भाजप खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, सत्यजित नाना कदम यांनी समरजीत घाटगे यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला होता. आणि आजच्या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रणही दिले होते. मात्र, महायुतीशी विषय संपला असं म्हणत समरजीत सिंह घाटगे यांनी आजच्या मेळाव्याला अनुपस्थिती दर्शवत आपली पुढील राजकीय वाटचाल कशी असेल? याची दिशा दाखवून दिली आहे.

Samarjeetsinh Ghatge : महायुती आणि माझा विषय संपला, समरजितसिंह घाटगे ठाम; हसन मुश्रीफांना पाडायचा चंग

के.पी. पाटील महायुतीला चौथा धक्का देण्याच्या तयारीत ?

एका बाजूला महायुतीमध्ये एकाच दिवसात तीन धक्के बसलेले असताना, अजित पवार गटाचे माजी आमदार के.पी. पाटील यांनी देखील आजच्या सभेला अनुपस्थिती लावली आहे. के. पी. पाटील देखील निवडणूक लढण्यास इच्छुक असून त्यांची देखील तयारी सुरू आहे. मात्र आबिटकर यांना तिकीट मिळण्याची शक्यता असल्याने के. पी. पाटील सुद्धा वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे ते देखील आजच्या मेळाव्याला अनुपस्थित होते. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मेळाव्याला देखील के. पी. पाटील यांनी अनुपस्थिती लावली होती.

Source link

k.p. patilKolhapur newsKolhapur News TodayKolhapur TOPICMH Election 2024के. पी. पाटीलकोल्हापूरकोल्हापूर बातमी
Comments (0)
Add Comment