बदलापूरच्या नराधमाला फाशीसाठी जोर, जान्हवी किल्लेकरची अखेर माघार, सकाळच्या दहा हेडलाईन्स

१. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीवर अशी कलमं लावा, की फाशीची शिक्षा झाली पाहिजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पोलिसांना सूचना, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, मुलीबाळींच्या अब्रूशी खेळणाऱ्या पाप्यांचे हात कलम करण्याचा इतिहास, शिंदेंचा दाखला, इथे वाचा सविस्तर वृत्त

२. महिला व मुलींविरोधातील गुन्ह्यांकडे गांभीर्याने पाहून योग्य तपास करण्याचे काम लोकांनी आंदोलने केल्यानंतरच पोलिस करणार का? मुंबई उच्च न्यायालयाचा अन्य प्रकरणाच्या निमित्ताने बदलापूर आंदोलनाच्या संदर्भाने तीव्र संताप

३. राज्यातील सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणे अनिवार्य, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाचा अध्यादेश, खर्चाचा भार संबंधित शाळांवरच, मुख्याध्यापकांवर आठवड्यातून तीन वेळा सीसीटीव्ही फूटेज तपासण्याची जबाबदारी, तरतुदींवर मुख्याध्यापक संघटनेचा आक्षेप, सरकारनेच शाळांना निधी उपलब्ध करुन देत फूटेज तपासणीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याची मागणी

४. शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्याविरोधात विनयभंग आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा, महिला पत्रकाराविषयी अर्वाच्य भाषेतील टिपण्णी भोवली, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी पोलिस ठाण्याबाहेर दिवसभर केलेल्या ठिय्या आंदोलनानंतर कारवाई

५. शाळकरी मुलीला दारु पाजून तिच्यावर बलात्कार, पुण्यात धक्कादायक घटना उघडकीस, मुलीच्या मित्रांसह एका मैत्रिणीविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल, आरोपीदेखील अल्पवयीन असल्याची माहिती

६. कोलकाता येथील डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ सरकारी रुग्णालयातील कनिष्ठ डॉक्टरांनी पुकारलेला संप बुधवारी सलग तेराव्या दिवशीही सुरु, आंदोलनामुळे पश्चिम बंगालच्या सरकारी रुग्णालयांतील आरोग्यसेवा कोलमडली

७. मुंबई किनारी पुढील काळात जहाज दुरुस्ती केंद्रासह नवे अतिरिक्त क्रुझ टर्मिनलही, कार्गो वाहतूकही दुप्पट होणार, नव्या सुविधांची संरचना मुंबई बंदर प्राधिकरणाकडून सुरु, १८७३ मध्ये स्थापन झालेले ‘बॉम्बे पोर्ट ट्रस्ट’ आता ‘सन २०४७’साठी सज्ज

८. राज्यात महाविकास आघाडीचीच सत्ता येणार, मंचावरचे काही जण मंत्री होणार, खासदार सुप्रिया सुळे यांची टिपण्णी, काँग्रेस नेते आबा बागूल यांची कळी खुलली, पर्वती विधानसभा काँग्रेसला देण्यासाठी शरद पवारांकडे विनंती

९. बिग बॉस मराठीत जान्हवी किल्लेकरकडून पंढरीनाथ कांबळेंची माफी, माझं खरंच चुकलं, हात जोडून क्षमायाचना, पॅडी म्हणाले, झालं गेलं राहू देत, खेळात जीव तोडून भांडूया, पण एकमेकांच्या करिअरचा स्तर निश्चित पाळूया, एकमेकांचा आदर करुया, इथे वाचा सविस्तर बातमी

१०. झोमॅटो आणि पेटीएममध्ये २४४.२ दशलक्ष डॉलर म्हणजेच २,०४८ कोटी रुपयांचा करार, चित्रपटांव्यतिरिक्त तिकीट व्यवसायात क्रीडा कार्यक्रम आणि मैफिलीची तिकिटेही झोमॅटोकडून खरेदी

Source link

Breaking Newstoday breaking newstoday headlinestop 10 headlinestop 10 headlines newstop 10 latest newsआजच्या ठळक बातम्याआजच्या बातम्याटॉप 10 ताज्या बातम्याठळक बातम्या
Comments (0)
Add Comment