Maharashtra Bandh: उद्याचा बंद बेकायदेशीर! मुंबई उच्च न्यायालयाचा महाविकास आघाडीला दणका; बंद केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश

Bombay High Court: महाविकास आघाडीकडून २४ ऑगस्ट रोजी पुकारण्यात आलेला बंद हा बेकायदेशीर असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. उद्या बंद केला तर कायदेशीर कारवाई करा असे आदेश कोर्टाने सरकारला दिले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबई: बदलापूर येथे शाळेत झालेल्या दोन लहान मुलींवर झालल्या अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीकडून उद्या म्हणजेच २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. यावर आता मुंबई उच्च न्यायालयाने महाविकास आघाडीला मोठा दणका दिला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला बंद पुकारण्याचा अधिकार नाही असे कोर्टाने म्हटले आहे.

अशा प्रकारचा बंद बेकायदेशीर असल्याचे सांगत कोर्टाने बंद केला तर कायदेशीर कारवाई करावी असे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या या बंदच्या विरोधात अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणी दरम्याान कोर्टाने सरकारला हे आदेश दिले आहेत.

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

bombay high court on maharashtra bandhmaharashtra bandh Illegalmaharashtra bandh newsmaharashtra bandh news todayबदलापूर अत्याचारमहाराष्ट्र बंदमहाविकास आघाडीमुंबई उच्च न्यायालय
Comments (0)
Add Comment