Rashi Bhavishya 24 August 2024 Today Horoscope in Marathi : आज २४ ऑगस्ट शनिवार आहे. रवि योग, वृद्धि योगासह अश्विनी नक्षत्राचा शुभ संयोग तयार होत आहे. त्यामुळे काही राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक वाद संपतील. नात्यात गोडवा राहिल. आज व्यवसायासाठी बाहेर जाल. भविष्यात त्यामुळे फायदा होईल. सासरच्या लोकांकडून आदर मिळेल. चला जाणून घेऊया मेष ते मीन राशीच्या सर्व 12 राशींसाठी रविवारचा दिवस कसा आहे.
आज २४ ऑगस्ट शनिवार आहे. रवि योग, वृद्धि योगासह अश्विनी नक्षत्राचा शुभ संयोग तयार होत आहे. त्यामुळे काही राशींना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कौटुंबिक वाद संपतील. नात्यात गोडवा राहिल. आज व्यवसायासाठी बाहेर जाल. भविष्यात त्यामुळे फायदा होईल. सासरच्या लोकांकडून आदर मिळेल. उत्पन्न आणि खर्च या दोन्हींवर नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा आर्थिक स्थिती ढासळेल. कुटुंबातील सदस्यांसह शुभ कार्यात सहभागी व्हाल. मेष ते मीन राशीच्या १२ राशींचे राशीफल कसे असेल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य
मेष – नात्यात गोडवा राहिल
आज तुमच्या मुलांच्या चिंतेवर उपाय मिळतील. कामामुळे तुम्हाला इतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कौटुंबिक वाद संपतील. नात्यात गोडवा राहिल. आज व्यवसायासाठी बाहेर जाल. भविष्यात त्यामुळे फायदा होईल. सासरच्या लोकांकडून आदर मिळेल. कुटुंबासोबत सहलीला जाल. फालतू खर्च आणि अनावश्यक वादांपासून दूर राहाल. वडिलांच्या आजाराने त्रस्त राहाल.
आज भाग्य ९३ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला लाडू अर्पण करा
वृषभ – पैस खर्च कराल
आज जवळच्या व्यक्तीच्या आरोग्याबाबत चिंतेत राहाल. तुम्हाला त्यांना मदत करावी लागेल. धार्मिक कार्यावर पैसे खर्च कराल. कुटुंबासोबत सहलीला जाल. फालतू खर्च आणि अनावश्यक वादांपासून दूर राहाल. वडिलांच्या आजाराने त्रस्त राहाल.
आज भाग्य ७७ टक्के तुमच्या बाजूने असेल. गायत्री मंत्राचा जप करा
मिथुन – अचानक धनलाभ होईल
आज अचानक धनलाभ होईल. त्यामुळे तुमचे मनोबल वाढेल. आज तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत काही अडथळे निर्माण होतील. लाइफ पार्टनरसाठी काही खरेदी कराल. उत्पन्न आणि खर्च या दोन्हींवर नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा आर्थिक स्थिती ढासळेल. कुटुंबातील सदस्यांसह शुभ कार्यात सहभागी व्हाल.
आज भाग्य ७१ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी लक्ष्मीची पूजा करा
कर्क – व्यवसायत नवीन प्रयत्न कराल
आज व्यवसायात नवीन प्रयत्न कराल. त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढेल. परिवार आणि चांगल्या गुणांच्या लोकांशी संवाद साधाल. पाहुण्यांच्या आगमनामुळे खर्च वाढेल. नात्यातील वाद आज संपतील.
आज भाग्य ७२ टक्के तुमच्या बाजूने असेल. विष्णुसहस्त्रनामाचे पठण करा
सिंह – पैसे खर्च कराल
आज दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल. व्यवसायातील समस्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर कराल. आज स्वत:साठी वेळ काढाल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना काही नवीन सौदे मिळतील. सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.
आज भाग्य ७१ टक्के तुमच्या बाजूने असेल. तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा
कन्या – आर्थिक स्थिती मजबूत
आज कुटुंबातील लोक चिंतेत सापडतील. मुलांच्या भविष्याबाबत चिंतेत असाल. व्यवसायात नफा मिळाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल. उत्पन्नापेक्षा जास्त पैसे खर्च केल्याने भविष्यात अडचणी येतील. शहाणपणाने पैसे खर्च करा.
आज भाग्य ६७ टक्के तुमच्या बाजूने असेल. गरजू लोकांना तांदूळ दान करा
तुळ – कामात यश मिळेल.
आज कोणतेही काम केल्यास त्यात यश मिळेल. नोकरीत इच्छेनुसार काम दिले जाईल. आजूबाजूचे वातावरण प्रसन्न राहिल. अधिकारी प्रशंसा करताना दिसतील. आज मालमत्ता खरेदी करताना विचारपूर्वक कराल.
आज भाग्य ८७ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला चपाती खाऊ घाला.
वृश्चिक – खर्चामुळे चिंतेत सापडाल
आज व्यवसायात तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. त्यासाठी सावध राहा. कामात उशीर नको. तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. फायद्यापेक्षा जास्त खर्चामुळे तुम्ही चिंतेत राहाल. स्थलांतराचे प्रश्न पुढे ढकलाल.
आज भाग्य ७७ टक्के तुमच्या बाजूने असेल. श्रीकृष्णाला खडीसाखर आणि लोण्याचा नैवेद्य दाखवा
धनु – आरोग्याच्या समस्या उद्भवतील
आज तुम्हाला शारीरिक आणि आर्थिक बळ मिळेल. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण कराल. तुमच्या खर्चात वाढ होईल. आई-वडिलांसोबत तीर्थस्थळी जाल. व्यवसायात कोणाचा तरी सल्ला घ्या. डोळ्यांच्या समस्या उद्भवतील.
आज भाग्य ६२ टक्के तुमच्या बाजूने असेल. योग आणि प्राणायामचा अभ्यास करा
मकर – पैशांची कमतरता भासेल
कामात सहकार्यांसोबत मतभेद होतील. दुकान किंवा घर घेण्याचा विचार करत असाल तर जोडीदाराचा सल्ला घ्या. शत्रू विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करतील. तुमची प्रगती पाहून नाराज होतील. पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागेल.
आज भाग्य ६५ टक्के तुमच्या बाजूने असेल. तुळशीला नियमितपणे जल अर्पण करून दिवा लावा.
कुंभ -प्रलंबित पैसे मिळतील
आज व्यवसायात लाभ होण्याची शक्यता राहिल. व्यवसायाच्या संदर्भात प्रवास होईल, ज्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. परदेशात व्यवसाय करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. मुलांच्या भविष्याबाबत चिंतेत असाल. सासरच्या व्यक्तीशी वाद होऊ शकतो. जोडीदार तुमच्यासोबत राहिल. प्रलंबित पैसे मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत राहिल.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला लाडूचा नैवेद्य अर्पण करा
मीन – संयम ठेवा
आज मानसिक तणाव टाळण्यासाठी संयम आणि नम्रतेने काम करावे लागेल. नोकरदार लोकांवर कामाचा ताण राहिल, अधिकार देखील वाढणार आहे. त्यामुळे काही समस्यांना सामोरे जावे लागेल. बुद्धिमत्तेने आणि आदराने काम पूर्ण करावे लागेल. मालमत्तेशी संबंधित वाद वाढतील. विद्यार्थ्यांचा उच्च शिक्षणाचा मार्ग मोकळा होईल.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिवलिंगावर दूध अर्पण करा