Vision 2047:मुंबई बंदरात चार हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ!एक लाख रोजगार;’व्हिजन २०४७’विकसित आत्मनिर्भर भारत’ उभा करण्याची तयारी…

Vision 2047:आगामी काळातील विकासात्मक कामांसाठी मुंबई बंदराने ‘व्हिजन २०४७’ अंतर्गत जवळपास ३४ प्रकल्पांचे नियोजन केले आहे. त्यातील काही प्रकल्प कार्यान्वित झाले असून काही भविष्यात होणार आहेत.

महाराष्ट्र टाइम्स
मुंबई बंदर
मुंबई: शतकोत्तर सुवर्णमहोत्सव अलीकडेच साजऱ्या केलेल्या मुंबई बंदर प्राधिकरणाने केंद्रीय बंदरे विकासमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते शुक्रवारी चार हजार कोटी रुपयांच्या कामांचा शुभारंभ केला. यामध्ये विविध सामंजस्य करार, भूखंडवाटप, भाडेकराराला मुदतवाढ, इंधन साठवणूक तळ आदींचा समावेश आहे.

आगामी काळातील विकासात्मक कामांसाठी मुंबई बंदराने ‘व्हिजन २०४७’ अंतर्गत जवळपास ३४ प्रकल्पांचे नियोजन केले आहे. त्यातील काही प्रकल्प कार्यान्वित झाले असून काही भविष्यात होणार आहेत. यातीलच काही प्रकल्पांचा सोनोवाल यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी सोनोवाल यांनी देशाला बंदर विकासांद्वारे समुद्रीक्षेत्रात जागतिक स्तरावर नेण्याचा संकल्प व्यक्त केला.
खुशखबर…! मुंबईच्या किनारी नवे क्रूझ टर्मिनल;काय आहे खासियत?

‘येत्या काळात भारताला बंदरक्षेत्रात जगातील दहा सर्वोत्तम देशांत यायचे आहे. त्यासाठीच पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली बंदरांच्या आधुनिकीकरणास सुरुवात झाली आहे. संपूर्ण देशवासीयांसाठी प्रोत्साहन ठरणारी देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील हे चार हजार कोटी रुपयांचे प्रकल्प त्याचाच एक भाग आहेत. या माध्यमातून मुंबई बंदर प्राधिकरण हे जागतिक स्तरावरील बंदरासाठी आवश्यक असे वातावरण तयार करीत आहे. अशाप्रकारच्या बंदर विकासामार्फत २०४७ चा पूर्णपणे विकसित आत्मनिर्भर भारत उभा होईल, असा विश्वास आहे. येत्या काळात मुंबईजवळ येणारे वार्षिक २३.२ दशलक्ष कंटेनर हाताळणी क्षमतेचे वाढवण बंदर हे देशाच्या सागरी क्षेत्राचा चेहरा बदलेल’, असे सोनोवाल म्हणाले.
पंतप्रधानांच्या पालघर दौऱ्याला विरोधाची किनार; वाढवण बंदराच्या भूमिपूजनाला माकप, आदिवासी संघटनांचा विरोध
जानेवारी २०२४ पासून ४३ क्रूझ जहाजे मुंबई बंदरात आली. त्यातील ४ हजार प्रवाशांची तीन तासांत सीमा शुल्कासंबंधी तपासणी पूर्ण झाल्याची माहिती यावेळी सीमा शुल्क विभागाचे मुख्य आयुक्त नितीश कुमार सिन्हा यांनी दिली. केंद्रीय बंदर विकास विभागाचे सचिव राजेश कुमार सिन्हा, मुंबई बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष राजीव जलोटा, उपाध्यक्ष आदेश तितरमारे, प्राधिकरणाचे सचिव पवन बाहेकर यांच्यासह प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
Mumbai-Goa Highway: ‘मुंबई-गोवा’वर जड वाहनांना बंदी; गणेशोत्सवासाठी सरकारचा मोठा निर्णय

या प्रकल्पांचा शुभारंभ

पीर पाऊ येथे रसायने साठवणूक धक्का
जवाहर द्वीपच्या किनारा संरक्षण व भराव प्रकल्पाचे भूमिपूजन
समुद्री तेल टर्मिनलच्या स्वयंचलित प्रणालीचे उद्घाटन
प्राधिकरणाच्या स्वयंचलित मालमत्ता कार्यावहन व्यवस्थापन प्रणालीचे उद्घाटन
हरित इंधन केंद्रासाठी सामंजस्य करार
कार्बन उत्सर्जन व्यवस्थापनासाठी सामंजस्य करार
गेट वे येथे प्रवासी सुरक्षेसाठी तरंगत्या फलाटासाठी करार
बॅलर्ड पीयरमधील बगिचा विकासासाठी करार
इंधन साठवणुकीसाठी सहा भूखंडांचे वितरण

Source link

Vision 2047आत्मनिर्भय भारतएक लाख रोजगारबंदरे विकासमुंबई बंदर३४ प्रकल्पांचे नियोजन
Comments (0)
Add Comment