जीवाच्या मुंबईचं रुपडं पालटणार; विकासकामांसाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद, वाचा नक्की काय बदलणार

Mahayuti Sarkar development fund for Mumbai : राज्यात विधानसभा निवडणुका येत्या काही महिन्यांत होणार आहेत. त्याआधी विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी राज्य, महापालिकास्तरावर लगबग सुरू आहे. याअंतर्गत मुंबई शहराच्या १० विधानसभा क्षेत्रांसाठी वॉर्डस्तरावर ५०० कोटी रुपयांचा विकासनिधी दिला जाणार आहे. मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी महापालिका मुख्यालयात याची घोषणा केली.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुका येत्या काही महिन्यांत होणार आहेत. त्याआधी विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी राज्य, महापालिकास्तरावर लगबग सुरू आहे. याअंतर्गत मुंबई शहराच्या १० विधानसभा क्षेत्रांसाठी वॉर्डस्तरावर ५०० कोटी रुपयांचा विकासनिधी दिला जाणार आहे. मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी महापालिका मुख्यालयात याची घोषणा केली. या निधीतून रस्ते, स्वच्छतागृहांसह अन्य विकासकामे मार्गी लावली जाणार आहेत. याव्यतिरिक्त राणीच्या बागेत भुयारी मत्स्यालय, हातगाडी ओढणाऱ्या कामगारांना बॅटरी ऑपरेटेड हातगाडी, माहीम ते वरळी पर्यटन बोटसुविधा आदी जुन्या, नवीन घोषणांही केसरकर यांनी यावेळी केल्या.

मुंबई महापालिकेत नुकतीच शिवसेना आणि भाजपच्या माजी नगरसेवकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन रखडलेल्या विकासकामांसाठी आढावा केला. शिवसेनेचे ४७ व भाजपचे ६० माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते. त्यांच्या मागणीत रस्त्यांची कामे, उद्यानांचे सुशोभीकरण, शौचालय दुरुस्ती आदी प्रमुख मागण्यांचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर केसरकर यांनी घेतलेले निर्णय विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे आहेत. विविध विकासकामांसाठी शहरातील १० विधानसभा क्षेत्रांत वॉर्डस्तरावर मुंबई महापालिकेकडून ३५० कोटी आणि जिल्हा वार्षिक नियोजन मंडळामार्फत (डीपीडीसी) १५० कोटी रुपये निधी उपलब्ध केला जाईल. लोकप्रतिनिधींकडून विधानसभा क्षेत्रातील विकासकामांची माहिती मागवण्यात आली होती. त्यामुळे ही कामे पूर्ण करण्यासाठी वॉर्ड अधिकाऱ्यांना हा निधी उपलब्ध दिला जाईल, असे केसरकर यांनी सांगितले.
Mumbai Local Mega Block: मुंबईकरांनो, उद्या तिन्ही रेल्वेमार्गांवर मेगाब्लॉक; कोणत्या लोकल रद्द? वाचा Timetable

राणीची बाग, सागरी किनारा मार्गावर मत्स्यालय

मुंबई महापालिकेकडून राणीच्या बागेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे भुयारी मत्स्यालय उभारण्याचे प्रस्तावित आहे. यासाठी जवळच असलेली मफतलाल कंपनीची जागा उपलब्ध आहे. वरळीतील मत्स्यालयाऐवजी सागरी किनारा मार्गातील एका ठिकाणी मत्स्यालय उभारण्याचे नियोजित आहे. या मार्गात मोकळ्या जागेत हरितक्षेत्र निर्माण करताना पदपथ, सायकल ट्रॅक आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. सायकल ट्रॅकसाठी स्वतंत्र पूल उभारला जाईल, असे केसरकर यांनी नमूद केले.

पर्यटनाच्या दृष्टीने चौपाट्यांचा विकास

माहीम ते वरळी कोळीवाडा अशी पर्यटनबोट सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी ससून डॉकप्रमाणेच वरळी कोळीवाडा येथे जेट्टीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. याचा अभ्यास सुरू असल्याचे केसरकर म्हणाले.

‘गेट वे प्लाझा’तून गेट वे ऑफ इंडिया

गेट वे प्लाझा हा नवा प्रकल्प तयार होत आहे. येत्या १५ दिवसांत त्याचे भूमिपूजन करण्याचा प्रयत्न आहे. यात आधी स्थानिक मराठी भाडेकरूंना वगळण्यात आले होते. आता त्यांचाही समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पात भूमिगत प्लाझातून पर्यटकांना दिमाखदार गेट वे ऑफ इंडियाचे दर्शन घेता येणार आहे, असे केसरकर यांनी सांगितले.
Vision 2047: मुंबई बंदरात चार हजार कोटींच्या कामांचा शुभारंभ! एक लाख रोजगार;’व्हिजन २०४७’विकसित आत्मनिर्भर भारत’ उभा करण्याची तयारी…

देवस्थान परिसरांचाही विकास

मुंबादेवी परिसर अतिक्रमणमुक्त करणे, येथील हातगाडीचालकांना बॅटरीवरील हातगाड्या, महालक्ष्मी मंदिर परिसराचाही विकास आराखडा तयार
त्यासाठी पहिल्या टप्प्यात २४ कोटी रुपये निधी देऊन लवकरच कार्यादेश
सिद्धिविनायक मंदिर परिसराच्या विकासासाठी ५०० कोटींचा निधी
हाजी अली दर्गा परिसराचा विकास करताना सुविधायुक्त इमारत

या प्रकल्पांचीही घोषणा

मुंबईतील धार्मिक स्थळ परिसरात उच्च दर्जाची विद्युत रोषणाई
जगन्नाथ शंकर शेट स्मारक मार्गी लावणार. एका महिन्यात भूमिपूजन
प्रदूषण नियंत्रणासाठी लखनऊ पॅटर्न. धुळीकण काढण्यासाठी नवीन यंत्रणा
दादर महाराष्ट्र सदनाचा विकास
शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी येथील लाटेबरोबर आलेली रेती टिकवून ठेवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान
कंटेनरमध्ये वातानुकूलित ग्रंथालय एका महिन्यात
फॅशन स्ट्रीटचा कायापालट. एका महिन्यात भूमिपूजन

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

500 crore fund for MumbaiGood news for Mumbaikarmahayuti sarkarmumbai breaking newsMumbai developmentमहायुती सरकारकडून मुंबईला निधीमुंबई महानगरपालिकामुंबईकरांसाठी आनंदाची बातमीमुंबईचा कायापालटशहराला विकासनिधी
Comments (0)
Add Comment