Monkeypox Virus: पुणे विमानतळावर प्रवाशांचे ‘थर्मल स्कॅनिंग’; ‘मंकीपॉक्स’चा धोका वाढताच आरोग्य विभाग अलर्ट मोडवर

Monkeypox Virus: जगभरात ‘मंकीपॉक्स’चा संसर्ग वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे; तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

महाराष्ट्र टाइम्स
Monkeypox Virus
म. टा. प्रतिनिधी, पुणे : जगभरात ‘मंकीपॉक्स’ विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने विमानतळावर येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे. पुणे विमानतळावर गेल्या पाच दिवसांमध्ये सिंगापूर आणि दुबई या देशांमधून आलेल्या ५३१ प्रवाशांची तपासणी करण्यात आली. यामध्ये एकही संशयित रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, खबरदारी म्हणून विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी आणि त्यांची माहिती घेण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने सप्ष्ट केले आहे.

जगभरात ‘मंकीपॉक्स’चा संसर्ग वाढत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेने चिंता व्यक्त केली आहे; तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागानेही सर्व आरोग्य यंत्रणांना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे महापालिका आरोग्य विभाग आणि विमानतळ प्रशासनातर्फे विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यात येत आहे.

शहरातील महापालिका रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना ‘मंकीपॉक्स’ची लक्षणे आहेत का? याची नोंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत; तसेच खासगी रुग्णालयांमध्ये संशयित रुग्ण आढळून आल्यास त्यांची माहिती महापालिका आरोग्य विभागाला देऊन रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था (एनआयव्ही) पाठवावे, अशा सूचना खासगी रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात खासगी डॉक्टर संघटनांनाही पत्र पाठवण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली.

हायकोर्टाने फटकारल्यानंतर गृहविभागाला खडबडून जाग, महिला सुरक्षेचे उपाय कडक करा, पोलिसांना निर्देश
फवारणीच्या सूचना

शहरात सध्या डेंगी, चिकनगुनिया, झिका या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने शहरातील सर्व भागांमध्ये फवारणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फवारणीसाठी आरोग्य विभागाने अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी केली होती. त्यानुसार येत्या दोन दिवसांमध्ये कर्मचारी उपलब्ध होतील. त्यानंतर फवारणीचे प्रमाण वाढेल, असे आरोग्य विभागाने सांगितले.

विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी पथक नियुक्त करण्यात आले आहे. विमानतळावर रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकाही संशयित रुग्ण आढळला नाही. मात्र, खबदारी म्हणून तपासणी करण्यात येत आहे. संशयित रुग्णांची माहिती आरोग्य विभागाला द्यावी, अशा सूचना सर्व रुग्णालयांना दिल्या आहेत.– डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, महापालिका

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

monkeypox virusmonkeypox virus symptomsmonkeypox virus treatmentNIVपुणे बातम्यापुणे महानगरपालिकाराष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था
Comments (0)
Add Comment