jalna steel compnay fire incident : जालना शहरातील गजकेसरी नावाच्या स्टील कंपनीच्या बॉयलरचा भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये 20 कामगार गंभीर जखमी झाल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर 4 कामगार आगीत होरपळले असल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
कामगारांचे मोबाईल हिसकावले
घटना घडताच कंपनीला बंद करून आतमध्ये काम करणाऱ्या कामगारांचे मोबाईल हिसकावण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, उपपोलीस अधीक्षक पियुष निपाणी, सह चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व पोलिसांनी धाव घेऊन घटनेची चौकशी सुरु केली आहे. जालना अद्योगिक वसाहातीत नेहमी किरकोळ घटना घडत असतात, याची माहिती लपवली जाते. तसेच पोलीसही माहिती देण्यास टाळाटाळ करतात अशी तक्रार स्थानिक लोकांकडून करण्यात आली आहे .
दरम्यान, जालना शहराचे स्टील कंपन्यांसाठी महाराष्ट्रात नव्हे तर देशांमध्ये देखील नाव घेतले जाते. यामध्ये प्रामुख्याने राजुरी स्टील, कालिका स्टील ,पोलाद ,नामवंत कंपन्या जालना शहरांमध्ये आहेत. जवळपास 20 ते 25 स्टील इंडस्ट्री एकट्या जालना शहरामध्ये आहे . या कंपनीमध्ये बाहेरील राज्यातील जवळपास 40 ते 50 हजार कामगार काम करत असतात. त्यामुळे अनेक कंपन्यांमध्ये स्फोट होत असतात. आतापर्यंत झालेल्या दुर्घटनांमध्ये अनेक कामगारांना आतापर्यंत आपला जीव गमावा लागलेला आहे तर काही लोकांना अपंगत्व देखील आलेलं आहे. त्यामुळे पोलिसांनी आणि प्रशासनाने तातडीने लक्षं घालावे मागणी करण्यात आली आहे.