शरद पवार हे महाराष्ट्रातील जातीवादी राजकारणाचे जनक- राज ठाकरेंचा हल्लाबोल; विधानसभेत जनता धडा शिकवेल

Raj Thackeray On Sharad Pawar: नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. पवारांनी राज्यात जातीवादी राजकारण आणले. त्यांनी आधी नेते आणि मग पक्ष फोडल्याचे राज ठाकरे म्हणाले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
नागपूर (जितेंद्र खापरे) : राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात सुरू झालेल्या वादावरून राज ठाकरे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला. पवार हे महाराष्ट्रातील जातीवादी राजकारणाचे जनक असल्याचे सांगून ठाकरे म्हणाले, “1991 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली तेव्हापासूनच या राज्यात जातीचे राजकारण सुरू झाले. आधी नेते आणि पक्ष फोडले गेले, नंतर जातीच्या नावावर भांडणे झाली. ” ते पुढे म्हणाले की, “पूर्वी कोणीही महापुरुष जातीच्या नावाने ओळखले जात नव्हते, पण पवारांच्या राजकारणामुळे महापुरुष जातीच्या आधारावर विभागले गेले.”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना पक्ष संघटना मजबूत करायची आहे, त्यासाठी ते सर्व जिल्ह्यांचा दौरा करत आहेत. राज्यातील 230 जागांवरून निवडणूक लढवणार असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे. यानंतर ठाकरे फडणवीस यांच्याविरोधातही आपला उमेदवार उभा करणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चा आणि प्रश्नांवर राज ठाकरेंनी मोठं विधान केलं आहे.

विदर्भ दौऱ्याचा एक भाग म्हणून ठाकरे शुक्रवारी नागपुरात पोहोचले होते. त्यानंतर शनिवारी त्यांनी रविभवन येथे पक्षाचे नेते आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीनंतर ठाकरे पत्रकारांशी बोलत होते. जिथे त्यांनी राज्याशी निगडीत अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले. विधानसभेच्या किती जागा लढवायच्या या प्रश्नाला उत्तर देताना ठाकरे म्हणाले, “राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये त्यांची स्क्रिनिंग टीम हजर आहे. आणि उमेदवार निवडण्याचे काम सुरू आहे. 2009 मध्ये आम्ही 230 जागांवर निवडणूक लढवली होती. यावेळीही आम्ही जवळपास 225 जागांवर निवडणूक लढवणार आहोत असे ही राज ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांचा विधानसभा जागे बाबतीत विचारले असता राज ठाकरे म्हणाले,यावर राज ठाकरे म्हणाले की, वरळी विधानसभा मतदारसंघात मनसेची 37 ते 38 हजार मते आहेत. गेल्या वेळी आम्ही तिथे निवडणूक लढवली नव्हती. मात्र यावेळी मनसे तिथे आपला उमेदवार उभा करणार आहे. केवळ वरळीतच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातही उमेदवार उभे करू तसेच नागपूरच्या सहाही जागांवर उमेदवार उभे करण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ठाकरे म्हणाले, नागपूरच्या सहाही जागांवर उमेदवार उभे करू. त्याअंतर्गत मनसेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर आपला उमेदवार उभा करणार आहे.

विधानसभेत जनता धडा शिकवेल

गेल्या पाच वर्षातील राज्यातील राजकीय घडामोडीबाबत बोलताना मनसेप्रमुख म्हणाले, “”गेल्या पाच वर्षात राज्यातील जनतेवर झालेल्या यातना जनता विसरलेली नाही. राज्याचे राजकारण आता एकप्रकारे चकचकीत झाले आहे. ही स्थिती एका वर्षात राज्यात निर्माण झालेली नाही आणि जनताही ती विसरणार नाही आणि आगामी विधानसभा निवडणुकीत त्याचा राग नक्कीच काढेल.

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Maharashtra politicsmaharashtra politics latest newsmaharashtra politics newsmaratha vs obc communitiesraj thackeray attacked on sharad pawarraj thackeray latest newsनागपूर बातम्याराज ठाकरेराज ठाकरेंचा शरद पवारांवर हल्लाबोलशरद पवार
Comments (0)
Add Comment