महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 24 Aug 2024, 6:06 pm
Thane Woman Marry To Pakistani boy : ठाण्यातील महिलेने पाकिस्तानच्या एका युवकाशी थेट केले लग्न. आजारी आईला भारतात पाहण्यासाठी आली पण दस्तावेजाच्या खोट्या माहितीमुळे महिलेची कोंडी झाली आहे. वास्तव्यास असलेल्या परिसरातील लोक तिला सीमा हैदर पार्ट टू असे म्हणत घुसखोर असल्याचा थेट आरोप करु लागले आहे.
मिडिया रिपोर्टनुसार नगमाने सनम असे नाव गैरसंवैधनिक पद्धतीने बदलून घेतले होते. २०२२ मध्ये नगमाची पाकिस्तानमधील एका
युवकासोबत मैत्री झाली होती. नंतर काही दिवसात नगमाने पाकिस्तानच्या युवकासोबत लग्न केले आणि पहिल्या पतीपासून झालेल्या दोन मुलींसह नगमाने थेट पाकिस्तान याच वर्षाच्या सुरुवातीला गाठले. १७ जुलैला ठाण्यात आजारी असलेल्या आईला पाहण्यासाठी नगमा पुन्हा भारतात आली. नगमाचे बदलेले नाव सनम आणि गैरपद्धतीने केलेली नावाची हेराफेरी त्यामुळे ठाण्यातील वर्तक नगर पोलीस स्थानकात चौकशी करण्यात आली. नगमाचे इतर सगळे भारतीय असल्याचे पुरावे पडताळण्यात आले. काहीनी सीमा हैदर बोलत पाकिस्तानी जासूस असल्याचे आरोप केले.
नगमाने स्थानिक दुकानदाराला वीस हजार देत नाव बदलून घेतले तसेच जन्मवर्ष १९९७ वरुन २००१ केले. पोलीसांनी दस्तावेज सोबत केलेल्या छेडछाड प्रकरणी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. साधारण २०१२ साली नगमाचे लग्न झाल होते. युपीच्या मुरादाबाद इथे आठवीत शिकत असताना नगमाच्या घरच्यांनी तिचे लग्न लावून दिले. नगमाचा आरोप आहे की, तिचा पहिला नवरा तिला मारहाण करायचा. २०१३ साली नगमाने पहिल्या मुलीला जन्म दिला. पण सततच्या मारहाणीमुळे नगमाने ठाण्यात राहणाऱ्या आईला सर्व प्रकार सांगून थेट मुलींसोबत ती आईसोबत ठाण्याला राहू लागली.
ठाण्यात सीमा हैदर पार्ट टू? पाकिस्तानमधून दोन मुलीसोबत ‘ती’ भारतात, पोलीसांकडून तपास सुरु
२०१९ साली नगमाच्या पहिल्या नवऱ्याचे निधन झाले. २०२१ च्या वर्षात फेसबुकवर तिला पाकिस्तानी युवक भेटला त्याची मैत्री वाढली प्रेमात रूपांतर झाले. दोघे एकमेकांवर प्रेम करु लागले.२०२२ मध्ये नगमा आणि पाकिस्तानी तरुणाच्या आईवडिलाने मिळून नगमा आणि तिच्या कुटुंबाशी संपर्क साधला आणि लग्नाची बोलणी केली. २०२३ मध्ये नगमाने स्वत:साठी आणि मुलीसाठी वीज आणि पासपोर्टसाठी अर्ज दाखल केला होता. पण जुलैमध्ये पाकिस्तातून परत भारतात आजारी आईला पाहण्यासाठी आल्यानंतर नगमा नाव आणि जन्मवर्षात केलेल्या लपवाछपवीमुळे पोलीसांच्या निशाण्यावर आली आहे.