Nalasopara Crime News: नालासोपाऱ्यात दोन गटात तुफान हाणामारी; चाकूने वार केल्याने एकाचा मृत्यू, तीन जखमी

Nalasopara Clash Between Two Groups: नालासोपारा येथील संतोषभवन परिसरातील कारगिल नाल्याजवळ दोन गटात झालेल्या हणामारीत एकाचा मृत्यू झाला आहे. यात अन्य ३ जण जखमी झाले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
विरार/नालासोपारा: दोन गटात झालेल्या तुफान हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नालासोपारा परिसरात घडली आहे. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत. तुळींज पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नालासोपारा येथील संतोषभवन परिसरातील कारगिल नाल्याजवळ परिसरातील दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. या हाणामारीत दोन्ही गटातील तरुणांनी एकमेकांना बेदम मारहाण केली. या हाणामारीत चाकूने वार केल्याने एक तरुण गंभीररित्या जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. दिपक पाल असे या हाणामारीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

शुक्रवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. त्याचप्रमाणे या हाणामारीत आकाश पाल व शुभम ठाकूर या दोघांवर चाकूने वार करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. आकाश पाल व शुभम ठाकुर यांच्या आणखी एक असे तीन जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांना कांदिवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अन्य वसईतील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमी झालेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.

घटनास्थळी सध्या पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. नालासोपारा येथे दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील तरुणांविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम 103 (1), 109,189, 190, 191, म.पो.ॲक्ट 35 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

nalasopara clashnalasopara crime newsnalasopara news todayदोन गटात हाणामारीनालासोपारा ताज्या बातम्यानालासोपारा बातमीनालासोपारा हत्या
Comments (0)
Add Comment