एकनाथ खडसेंवर दुःखाचा डोंगर कोसळला, नेपाळ बस अपघातात गमावला मित्र; मृतांचा आकडा वाढला

जळगाव, निलेश पाटील : नेपाळ येथील अपघातात जळगाव जिल्ह्यातील मयत व्यक्तीचा आकडा वाढला अशी माहिती मिळत आहे. नेपाळ येथील अपघातात गंभीर जखमी असलेल्या जळगावच्या वरणगाव येथील आणखी तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार एकनाथ खडसे यांनी दिली आहे. नेपाळमधील अपघातात आता मृताचा आकडा ३० वर पोहचला असल्याची माहिती खडसे यांनी माध्यामांना दिली. घटना अत्यंत दुर्दैवी असून सर्वांना श्रद्धांजली अर्पण करतो असे खडसे म्हणाले. नेपाळ येथील अपघातामध्ये एकनाथ खडसे यांच्या बालपणीच्या मित्राचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे खुद्द खडसेंनी सुद्धा याबाबत प्रतिक्रिया दिली तसेच बोलत असताना खडसे भावूक सुद्धा झाले.
जळगाव विमानतळावर शोकाकूल वातावरण! २५ भाविकांचे मृतदेह दाखल, नातेवाईकांचा आक्रोश

नेपाळ येथून जळगाव विमानतळावर मृतदेह आणण्यात आले, तेथून रुग्णवाहिकेतून मृतदेह वरणगाव येथे नेण्यात आले. वरणगाव येथील मयत कुटुंबियांच्या नातेवाईकांची एकनाथ खडसे यांनी भेट घेत सांत्वन केले. नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम असल्यामुळे आजच रात्री मयत व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची एकनाथ खडसे यांनी माहिती दिली.

खडसे नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमाला जाणार?

रविवारी जळगावमध्ये होणारा लखपती दीदी कार्यक्रमाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत. याच कार्यक्रमाला एकनाथ खडसे हजेरी लावणार का असा प्रश्न विचारण्यात आला यावर खडसे म्हणाले, त्यांचा हा शासकीय कार्यक्रम मात्र त्याचं कुठल्याही निमंत्रण आमदार म्हणून मला दिलेल नाही त्यामुळे मी कार्यक्रमाला जाणार नाही अशी भूमिका त्यांनी बोलून दाखवली. जिल्ह्यात नरेंद्र मोदी यांचा लखपती दीदी हा शासकीय कार्यक्रम असताना सुद्धा आतापर्यंत त्याचं शासकीय निमंत्रण मिळालं नसल्याचं एकनाथ खडसे यांनी माध्यामांसमोर थेट बोलून दाखवले. पुढे खडसे म्हणाले, सर्व आमदारांना शासकीय कार्यक्रम असल्यामुळे निमंत्रण देणं नियमानुसार बंधनकारक असते असे असताना सुद्धा निमंत्रण देण्यात आले नाही. तसेच जर वेळेत निमंत्रण मिळाला असतं तर कार्यक्रमाला जाणार होतो मात्र आता आहे त्यावेळी जर निमंत्रण मिळालं तर जाणार नसल्याची एकनाथ खडसे यांनी जाहीर केले.

Source link

jalgaon devotes died in nepal bus accidentnepal devotes bus accidentएकनाथ खडसेजळगाव भाविकनेपाळ बस दुर्घटनानेपाळ बस दुर्घटना अपडेट न्यूजपीएम मोदीरक्षा खडसे
Comments (0)
Add Comment