मुंबईकरांनो, रेसकोर्सचं भविष्य तुमच्या हाती; बीएमसीने मागवल्या हरकती व सूचना, ​​२२ सप्टेंबरपर्यंत मांडा तुमचं मत

मुंबई : महालक्ष्मी रेसकॉर्सवर भव्य अशा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेंट्रल पार्कची उभारणी केली जाणार आहे. यासाठी लागणारा भूखंडही महापालिकेच्या ताब्यात आला आहे.

मुंबई महापालिका या पार्कसाठी आराखडा तयार करत आहे. आता पार्क उभारणी आधी मुंबई महापालिका मुंबईकरांकडून हरकती व सूचना मागवणार आहे. सध्या रेसकोर्सचा भाग मनोरंजन मैदान म्हणून आरक्षित असून यामध्ये काही बदल केले जाणार आहे. यासाठी विकास नियंत्रण निमयावली २०३४मध्ये केल्या जाणाऱ्या बदलांमुळे रेसकॉर्सबाबत मुंबईकरांकडून हरकती व सूचना मागवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

महालक्ष्मी रेसकोर्सवरील सुमारे १२० एकर क्षेत्र आणि त्यासोबत मुंबई किनारा रस्ता प्रकल्पातील सुमारे १७५ एकर क्षेत्र असे संपूर्ण मिळून जवळपास ३०० एकर क्षेत्रावर सेंट्रल पार्कची उभारणी केली जाणार आहे. महालक्ष्मी रेसकोर्स भूखंडावरील एकूण २११ एकरपैकी सुमारे ९१ एकर भूखंड ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड यांना देण्याच्या करारावरही जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित स्वाक्षरी करण्यात आल्या होत्या. त्यामुळे १२० एकर जागा मुंबई महापालिकेला प्राप्त झाल्याने न्यूयॉर्क, लंडनच्या धर्तीवर सेंट्रल पार्क उभारण्याच्या कामाला आता महापालिका गती देणार आहे. या कामासाठी मुंबई महापालिकेकडून आराखडा बनवला जाणार आहे. तर वास्तुविशारदाची नेमणूक करण्याचे काम प्रगतिपथावर आहे.

१७५ एकर मोकळी जागा उपलब्ध होणार

महापालिकेच्या मुंबई सागरी किनारा प्रकल्पात तब्बल १७५ एकर मोकळी जागा उपलब्ध होणार आहे. या ठिकाणीही उद्यानासाठी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत. रेसकॉर्स येथूनच भुयारी मार्ग करून तो सागरी किनारा मार्गालाही थेट जोडण्याचे नियोजन आहे. हे पार्क एक ते दीड वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले असून पार्कच्या कामासाठी लवकरच निविदाही काढली जाणार आहे. त्यानुसार महापालिकेच्या विकास नियोजन विभागाने एक सार्वजनिक सूचना जारी केली असून महालक्ष्मी रेसकोर्सचे आरक्षण व बदलाबाबत सूचना व हरकती मागवल्या आहेत.
Mumbai News: जीवाच्या मुंबईचं रुपडं पालटणार; विकासकामांसाठी ५०० कोटींच्या निधीची तरतूद, वाचा नक्की काय बदलणार
२२ सप्टेंबरपर्यंत मुदत

२ सप्टेंबरपर्यंत हरकती व सूचना सादर करण्याची मुदत आहे. या मुदतीनंतर महापालिकेला मिळालेल्या सूचना व हरकतींवर अभ्यास करून आरक्षण बदलांवर निर्णय घेईल आणि त्यानंतर महापालिका आयुक्तांची मंजुरी घेण्यात येणार आहे. आयुक्तांच्या मंजुरीनंतर राज्य सरकारकडेही अंतिम मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवला जाणार आहे. यासंदर्भात महापालिकेने काढलेल्या नोटीसमध्ये खेळाची मैदाने, उद्याने, वनस्पती उद्यान, वॉकिंग ट्रॅक, चिल्ड्रन पार्क, कला आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जागा यांचा समावेश यामध्ये आहे. रेसकोर्सच्या ट्रॅक अबाधित राहावा, यासाठी थीम पार्कच्या विकासाची रचना केली जाईल. प्रस्तावित बदलांचा आराखडा मुंबई महापालिका मुख्यालयाच्या विकास नियोजन विभागात पाहता येणार असून याच कार्यालयात सूचना व हरकती सादर करू शकता, असे महापालिकेने आवाहन केले आहे.

Source link

central park in mumbaimahalaxmi race courseMumbai Coastal Roadमहालक्ष्मी रेसकोर्समुंबई बातम्यामुंबई महानगरपालिकामुंबई सागरी किनारा प्रकल्प
Comments (0)
Add Comment