पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जळगावात; ‘लखपती दीदीं’शी साधणार संवाद, कार्यक्रमासाठी भव्य सुसज्जता

म. टा. प्रतिनिधी, जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज, रविवारी ‘लखपती दीदीं’चा मेळावा होणार आहे. जळगाव विमानतळ परिसरातील २२ एकर क्षेत्रात यासाठी भव्य वॉटरफ्रुफ मंडप उभारण्यात आला आहे. भर पावसात प्रशासनाची मेळाव्याच्या तयारीसाठी कसरत सुरू आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण विमानतळ परिसरावर केंद्रीय यंत्रणांची करडी नजर राहणार आहे.

रविवारी सकाळी ११ ते दुपारी १ वाजेदरम्यान होणाऱ्या या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय पथक शुक्रवारी रात्रीच दाखल झाले. शनिवारी सकाळी मेळावा परिसरासह विमानतळाची सुत्रे या यंत्रणांनी हाती घेतली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र व राज्य मंत्रीमंडळातील अनेक सहकारी या मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
Air India Fine: एक चूक अन् एअर इंडियाला भरावा लागेल ९० लाखांचा दंड; कारण ही तितकेच गंभीर, काय प्रकरण?
दरम्यान, देशभरातील १०० लखपती दीदींशी पंतप्रधान संवाद साधणार आहेत. त्यादृष्टीने त्यांना गुरुवारपासून शहरातील एका हॉटेलमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे. शनिवारी या लखपती दीदींना विमानतळ व मेळाव्यास्थळी नेण्यात आले. त्याठिकाणी सराव करून घेण्यात आला.

मेळावास्थळी शनिवारी सकाळी ७ वाजल्यापासून केंद्रीय यंत्रणांना खासगी व्यक्तींना येण्यास बंदी घातली आहे. या मेळावा परिसरात ग्रामीण जीवनशैलीवर आधारलेली वस्ती साकारली जात आहे. या वस्तीतील झोपड्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृती, कलाकृतीसह अन्य उपक्रमांचे पंतप्रधानांसमक्ष सादरीकरण करण्यात येणार आहे.

वाहतूक मार्गात बदल

औरंगाबादकडे जाणारी व औरंगाबादहून येणारी वाहतूक रविवारी सकाळपासून अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. त्यानुसार ही वाहतूक इच्छादेवी चौकातून शिरसोली, नेरीमार्गे वळविण्यात आली आहे. तसेच विमानतळासह मेळावा परिसरात खासगी वाहनांना प्रवेश नसेल. स्थानिक रहिवाशांना मात्र अजिंठा चौफुली, कुसुंबा, चिंचोलीमार्गे प्रवास करता येणार आहे. मात्र मार्गात कुठेही थांबता येणार नाही.

Chandrayaan-4: कसं असेल चांद्रयान-४ मिशन? अवकाशात कधी झेपावणार? ISRO प्रमुखांची मोठी घोषणा

भरपावसात तयारीसाठी कसरत

जळगावात दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने मेळाव्याच्या तयारीसाठी जिल्हा प्रशासन तसेच केंद्रीय अधिकाऱ्यांची सकाळपासून चांगलीच तारांबळ उडालेली आहे. मैदान कोरडे करण्यासाठी २५ जेसीबी, ५० डंपर, १५ रोडरोलर घेऊन शेकडो अधिकारी-कर्मचारी कामाला लागले आहेत.

अशी आहे व्यवस्था

  • वॉटरप्रूफ डोम-०५
  • प्रति डोम क्षमता-३० हजार
  • मुख्य व्यासपीठ-०१
  • कलावंतांसाठी व्यासपीठ-१
  • बसेस वाहनतळ-०७
  • प्रसाधनगृहे-४००
  • वैद्यकीय सुविधा केंद्र-१४०
  • नियंत्रण कक्ष-०१
  • सीसीटीव्ही प्रणाली-११० ठिकाणी
  • हेल्पलाईन क्र.-१०७७
  • दीदींसाठी बसेस-२१२९

Source link

bjp for vidhan sabhaLakhpati Didi sammelanmodi Maharashtra tourpm jalgon tourPM Modiजळगावमधील मोदींची सभापंतप्रधान मोदीभाजप विधानसभेसाठी तयारीमोदींचा महाराष्ट्र दौरालखपती दीदींचे संमेलन
Comments (0)
Add Comment