Pune Rain: पुण्यात संततधार, पावसाचा रेड अलर्ट, घाट माथ्यावर मुसळधार, खडकवासलातून विसर्ग सुरु

म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये शनिवारी संततधार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून पावसाच्या लहान-मोठ्या सरी बरसत होत्या. दुपारनंतर पावसाचा जोर वाढल्याने नोकरदारांसह ‘वीकेंड’ला खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांची तारांबळ झाली. रविवारीही शहरात मध्यम ते जोरदार आणि घाट विभागात अत्यंत जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे. घाट विभागासाठी ‘रेड अलर्ट’ही विभागाने दिला आहे.

शहरात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच होती. शनिवारी मात्र सकाळीच पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली आणि दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. दुपारनंतर पावसाचा जोर काही परिसरात वाढला होता. यामुळे शहरातील सखल भागांत पाणी साचले होते. सायंकाळनंतर शहरात वाहतूक कोंडीचा त्रासही नागरिकांना सहन करावा लागला.

पुणे शहर आणि परिसरात रविवारी आकाश सामान्यत: ढगाळ राहून मध्यम ते जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे. घाट विभागात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून, घाट विभागासाठी ‘रेड अलर्ट’ दिला आहे. शनिवारी कमाल तापमानातही घट झाली असून, २६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
Nepal Bus Accident Jalgaon: घरातील कर्ता पुरुष गेला, कुणी आईवडील गमावले, दाम्पत्यांचा एकत्र अंत, नेपाळ अपघाताने वरणगाव सुन्न
शहरात रात्री ८.३० वाजेपर्यंत झालेली पावसाची नोंद (आकडे मिलिमीटरमध्ये)

खडकवासला ३८.८

एनडीए ३१

लवळे ३०

चिंचवड २७

कात्रज २८.४

वारजे २४.८

डेक्कन २२.६

शिवाजीनगर १७.६

पाषाण १६.६

खडकी १६.६

लोहगाव १०.२

कोरेगाव पार्क ९.५

मुठा नदीपात्रातील विसर्गात वाढ

खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सकाळपासूनच विसर्ग सुरू होता. टप्प्याटप्प्याने हा विसर्ग वाढविण्यात येत होता. सायंकाळपर्यंत याची पातळी २० हजार क्युसेकच्या पुढे गेली होती. रात्री आठ वाजता २७ हजार ८४१ क्युसेक, रात्री १० वाजता ३१ हजार ५१५ क्युसेक विसर्ग करण्यात आला. यामुळे शनिवार पेठ, डेक्कन, पाटील इस्टेट परिसरातील नदीपात्राजवळील रस्त्यांवर पाणी आले होते. अचानक पाण्याची पातळी वाढल्याने नदीपात्रात अनेक चारचाकी वाहनेही पाण्यात अडकली.

Source link

discharge from khadkwasla damPunepune flood situationpune paus batmyaPune Rain Updatesखडकवासला धरणपुणे पाऊसपुणे पूरपुण्यात मुसळधार पाऊसपुण्याला रेड अलर्ट
Comments (0)
Add Comment