हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता! भाजपला झटका, भरणेंना टक्कर देणार

पुणे : युती आणि आघाडी सरकारमध्ये मंत्री राहिलेले, काँग्रेसमध्ये असताना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणारे, परंतु दरम्यानच्या काळात राजकीय समीकरणे बदलल्यामुळे भाजपात गेलेले राज्याचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षांतराच्या चर्चांनी जोर धरला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापूरची जागा विद्यमान आमदार दत्ता भरणे यांनाच जाणार असल्याने हर्षवर्धन पाटील यांना महायुतीत उमेदवारी मिळणार नाही, हे जवळपास निश्चित झाल्याने त्यांनी ‘आपला मार्ग’ आखायला सुरूवात केली आहे. हर्षवर्धन पाटील लवकरच शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहे.

महायुतीमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीची एन्ट्री झाल्यापासून राज्यातली राजकीय समीकरणे पूर्णपणे पालटून गेली आहेत. त्यामुळे विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या महायुतीमधील नेत्यांमध्ये प्रचंड स्पर्धा आहे. विद्यमान आमदारालाच तिकीट द्यायचे, हा महायुतीचा नियम ठरला असल्याने तेथील अन्य पक्षाच्या नेत्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत. कोल्हापूरच्या कागलमध्ये हसन मुश्रीफ विद्यमान आमदार असल्याने तेथे समरजीतसिंह घाटगे यांना विधानसभा निवडणूक लढविण्यास संधी मिळणार नव्हती. त्याचमुळे त्यांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला. अगदी तसाच निर्णय हर्षवर्धन पाटील घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
MH Election 2024 : हर्षवर्धन पाटलांना जायचं असेल तर ते जावू शकता, बावनकुळेंचं मोठं विधान

हर्षवर्धन पाटील तुतारी का फुंकणार?

हर्षवर्धन पाटील हे राज्यातले ज्येष्ठ नेते. १९९५ सालच्या सेना भाजप युतीच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. १९९९ पासून २०१४ पर्यंत त्यांनी इंदापूरचे प्रतिनिधित्व केले. दरम्यानच्या आघाडी सरकारच्या काळात त्यांनी महत्त्वाची मंत्रिपदे भूषवली. परंतु आघाडीमधूनच इंदापुरात त्यांना आव्हान दिले जायचे. अजित पवार यांचे निकटवर्तीय, माजी जि.प. अध्यक्ष दत्ता भरणे यांना दादांनी बळ दिले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सगळे पक्ष वेगवेगळे लढल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार दत्ता भरणे यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकीटावर उभे असलेले हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. पुढे २०१९ ला आघाडीत विद्यमान आमदार म्हणून भरणे यांनाच तिकीट देण्याचे संकेत आघाडीतील नेत्यांनी दिले. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची वाट धरली.
Samarjit Singh Ghatge : गेल्या वर्षभरापासूनची चिंता मिटली, समरजीतसिंह घाटगे यांच्या निर्णयावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमधली पाच वर्षे बऱ्यापैकी शांततेत घालवली. काँग्रेसमध्ये असताना त्यांचा रुबाब असायचा मात्र भाजपमध्ये गेल्यावर ते बातम्यांमधून बाहेर फेकले गेले. एवढे कमी म्हणून की काय, अजितदादांच्या महायुतीतील एन्ट्रीने पुन्हा विद्यमान आमदार म्हणून भरणे यांनाच तिकीट मिळणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याने त्यांची अधिक घुसमट झाली. त्याचमुळे त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून भरणे यांच्याशी दोन करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते आहे.
जयंत पाटील वळसे पाटलांच्या सासुरवाडीत, अजितदादा गटाला धक्का, डहाकेंना विधानसभेचे तिकीट?

सुप्रिया सुळे यांच्या विधानाने चर्चांना उधाण

हर्षवर्धन पाटील हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या परिवाराचे आणि आमचे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांच्या पुढच्या पिढीनेही ते संबंध जपले आहेत. हर्षवर्धन पाटील हे इंदापूरवासीय आणि महाराष्ट्र हिताचाच निर्णय घेतील, त्यांना माझ्या शुभेच्छा, असे सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या राष्ट्रवादीतील संभाव्य एन्ट्रीवर सांगितले.

चंद्रशेखर बावनकुळे यांचेही मोठे वक्तव्य

समरजीतसिंह घाटगे यांनीही विधानसभेच्या विधानसभेसाठी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला. हर्षवर्धन पाटीलही शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चा आहेत, असे पत्रकारांनी विचारले असता, बावनकुळे म्हणाले- “ज्यांना जायचंच ते जाऊ शकतात, त्यांना कसे काय रोखू शकतो? महायुतीत ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, ते सध्या उमेदवारीसाठी दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत. तसेच महाविकास आघाडीमधील काही नेते आमच्या संपर्कात आहेत”.

Source link

datta bharne vs harshvardhan patilharshvardhan patilHarshvardhan patil May be Join Sharad pawar Campindapur Vidhan SabhaIndapur Vidhan Sabha Election 2024इंदापूर विधानसभा २०२४हर्षवर्धन पाटीलहर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभा
Comments (0)
Add Comment