मृत्यू आधी चिठ्ठी लिहिली, सावकाराच्या त्रासाला कंटाळून आयुष्य संपवलं; ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अर्जुन राठोड, नांदेड : नांदेड जिल्ह्यात अवैध सावकारीचा जाच वाढत आहे. पैशासाठी शेतकऱ्यांकडे सावकाराकडून तगादा लावला जात असून अनेक जण सावकाराच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवत आहेत. असाच एक प्रकार नांदेड जिल्हातील अर्धापूर तालुक्यात घडला आहे. सावकारी जाचाला कंटाळून एका ग्रामसेवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी ग्रामसेवकाने चिठ्ठी देखील लिहली. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नारायण वैजनाथ कागदे (वय ४८) असं मृत ग्रामसेवकाचं नाव आहे.

नारायण कागदे हे अर्धापूर तालुक्यातील गणपूर येथे ग्रामसेवक पदावर कार्यरत होते. उमरी गावात त्यांची त्यांची साडे तीन एकर शेती आहे. २०१३ साली कागदे यांनी बाळासाहेब कदम यांच्या कडून १३ लाख ६० हजार रुपये इतके पैसे व्याजाने घेतले होते. व्याजाच्या बदल्यात त्यांनी सावकराकडे अडीच एकर शेती गहाण ठेवली होती.
अटल सेतूवरुन महिलेची उडी, ड्रायव्हरने तिचे केस पकडले आणि…१६ सेकंदात काय घडलं? सांगितला संपूर्ण घटनाक्रम
काही वर्षांनंतर व्याजाचे पैसे परत करून ही गहाण ठेवलेली जमीन सावकाराकडून नारायण कागदे यांना परत केली जात नव्हती. एवढंच नाही तर सावकारांनी नारायण कागदे यांची जमीन परस्पर विक्री केली. त्याशिवाय इतर सावकरांकडून ग्रामसेवक नारायण कागदे यांना त्रास दिला जात होता. याच त्रासाला कंटाळून नारायण कागदे यांनी शेतातील शेडला रुमालाने गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठी देखील लिहली आहे. शिवराज बालासाहेब कदम रा. निवघा (बाजार) ता. हदगाव, पंजाबराव रामराव नळगे (रा. भानेगाव ता. हदगाव), प्रसाद विठ्ठल सुर्यवंशी (रा. पिंगळी परभणी), संजय तुळशिराम मुधळ (रा.उमरी ता. अर्धापूर), भाऊराव दशरथ मुधळ (रा. उमरी ता. अर्धापूर), दशरथ आबाजी मुधळ (रा. उमरी ता. अर्धापूर) या लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख चिठ्ठीत केला आहे.
Nanded News : नांदेडच्या शेतकऱ्याचा पावसाळी रानभाजी कर्टुले लागवडीचा यशस्वी प्रयोग, चार महिन्यात लाखोंचं उत्पन्न
मृत नारायण कागदे यांचा भाऊ ईश्वर वैजनाथ कागदे यांच्या फिर्यादीवरून अर्धापूर पोलिसांनी सहा जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आयुब शेख हे करत आहेत. मृत नारायण कागदे यांच्यावर उमरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, आज्जी, पत्नी, दोन मुलं असा परिवार आहे.

Source link

Nandednanded ardhapur farmernanded farmer ends lifenanded newsनांदेड अर्धापूर बातमीनांदेड बातमीनांदेड शेतकरी आत्महत्यानांदेड सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या
Comments (0)
Add Comment