राज ठाकरेंच्या सुरक्षा रक्षक – कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
राज ठाकरे यांनी शेगांव येथील मंगल कार्यालयात कार्यकर्ता आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्ता राज ठाकरे यांना भेटण्यासाठी जात होता, त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्याला बाहेर काढलं. त्यावेळी राज ठाकरे यांचे सुरक्षा रक्षक आणि कार्यकर्तांमध्ये बाचाबाची झाली. या कार्यकर्ते आणि सुरक्षा रक्षकामध्ये झालेल्या बाचाबाचीमुळे एकच धांदल उडाल्याचं चित्र दिसून आलं. हा प्रकार झाल्यानंतर आपला विदर्भाचा दौरा रविवारी पूर्ण करत राज ठाकरे हे मुंबईकडे निघाले.
दरम्यान, आपल्या अकोला दौऱ्या दरम्यान राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत ताकदीने उतरण्यासाठी कानमंत्र दिला, तर विदर्भातील काही ठिकाणच्या उमेदवारांची नावं याआधी त्यांनी जाहीर केली आहेत, मात्र अकोल्यात त्यांनी एकही उमेदवारी सध्या जाहीर केली नाही.
राज ठाकरेंची झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी
कार्यक्रम स्थळी राज ठाकरे यांच्यासोबत फोटो सेल्फी घेण्यासाठी आणि त्यांची एक झलक पाहण्यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्ते यांच्या व्यतिरिक्त मोठी गर्दी जमली होती. परिसरातील तरुणवर्ग बराच वेळ राज ठाकरे यांची पाहत होता. गर्दीतील प्रत्येकजण राज साहेब ठाकरे यांच्या जवळ जाऊन त्यांची जवळून झलक पाहण्यासाठी गर्दी करत होते. त्याचवेळी ही बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला.
राज ठाकरे यांचा दौरा होणार होता हे नक्की होतं. मात्र ते केवळ पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार, की सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्ये यांच्यासोबत सभा घेणार हे स्पष्ट नसल्यामुळे मोठी धांदल उडाली होती. एका छोट्याशा मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात कुठेही नियोजन नव्हतं. त्यामुळे अनेकजण राज ठाकरेंसोबत फोटो काढण्यासाठी, त्यांना भेटण्यासाठी, त्यांची झलक पाहण्यासाठी गर्दी करत होते.