सोमवार २६ ॲागस्ट २०२४, भारतीय सौर ४ भाद्रपद शके १९४६, श्रावण कृष्ण अष्टमी उत्तररात्री २-१९ पर्यंत, चंद्रनक्षत्र: कृत्तिका दुपारी ३-५४ पर्यंत, चंद्रराशी: वृषभ, सूर्यनक्षत्र: मघा
कृतिका नक्षत्र दुपारी ३ वाजून ५५ मिनिटांपर्यंत त्यानंतर रोहिणी नक्षत्र प्रारंभ, व्याघात योग रात्री १० वाजून १७ मिनिटांपर्यंत त्यानंतर हर्षण योग प्रारंभ, बालव करण दुपारी ३ वाजेपर्यंत, त्यानंतर तैतिल करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र वृषभ राशीत राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२३
- सूर्यास्त: सायं. ६-५७
- चंद्रोदय: रात्री १२-०३
- चंद्रास्त: दुपारी १२-५२
- पूर्ण भरती: पहाटे ४-४१ पाण्याची उंची ३.८५ मीटर, सायं. ४-२२ पाण्याची उंची ३.५८ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी १०-२५ पाण्याची उंची २.१२ मीटर, रात्री १०-४१ पाण्याची उंची १.१८ मीटर
- दिनविशेष: कालाष्टमी, श्रीकृष्ण जयंती उपवास, ज्ञानेश्वर माऊली जन्माष्टमी, शिवपूजन शिवामूठ जवस
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २७ मिनिटे ते ५ वाजून १२ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३१ मिनिटांपासून ते ३ वाजून २३ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून १ मिनिटांपासून ते १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ४९ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ११ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ९ वाजून ९ मिनिटांपासून ते १० वाजून ४६ मिनिटांपर्यत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ४८ मिनिटांपासून ते १ वाजून ४० मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी ३ वाजून २३ मिनिटांपासून ते ४ वाजून १४ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय
आज जन्माष्टमी असल्यामुळे भगवान श्रीकृष्णाला लोणी-साखरेचा नैवेद्य दाखवा.
(आचार्य कृष्णदत्त)