मुंबई : कांदिवली येथील १३ वर्षाच्या मुलावर धार्मिक शिक्षण संस्थेत लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार पोलिसांना मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार पीडित मुलावर दोनवेळा अत्याचार झाला आहे. या प्रकरणी १५ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. दुसऱ्या अत्याचाराच्या घटनेमध्ये कोणाचा सहभाग होता, याबाबत अद्याप माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.पीडित मुलाच्या आईच्या तक्रारीवरून या प्रकरणी पोक्सो कायद्याच्या कलम ४ व ८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार पीडित मुलगा एका धार्मिक शिक्षण संस्थेत शिकत होता. त्याच्याबरोबर शिक्षण घेणाऱ्या १५ वर्षीय मुलाने यावर्षी २६ मे रोजी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. या प्रकरणी पीडित मुलाची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. याशिवाय तक्रारीनुसार, पीडित मुलावर २१ ऑगस्टलाही लैंगिक अत्याचार झाला होता. पण तो कोणी केला, याबाबत माहिती नसल्यामुळे अनोळखी व्यक्तीविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलाचा जबाब अद्याप घेण्यात आलेला नाही. त्यामुळे दुसऱ्या घटनेत कोणाचा सहभाग होता, हे अद्याप स्पष्ट नसल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
शिंदे गटाच्या मंत्र्याचा पुतण्या शरद पवारांच्या भेटीसाठी, विधानसभेसाठी तुतारीकडे ओढा, शिंदेंना धक्का बसणार
१७ वर्षीय मुलीवर सामुहिक अत्याचार
मुंबईच्या पश्चिम उपनगरात राहणारी १७ वर्षीय पिडीत मुलीची एक मैत्रीण नालासोपार्यात राहते. तिला भेटण्यासाठी ती अधून मधून नालासोपार्याला यायची. मैत्रीणीच्या घराशेजारी असणाऱ्या एका फोटो स्टुडियोत काम करणार्या तरुणाची तिची मागच्या आठवड्यात ओळख झाली होती. गुरुवारी २५ वर्षीय सोनू नामक तरूणाने तिला भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार पीडित नालासोपारा स्थानकात आली. यावेळी आरोपी सोबत त्याचा मित्र होता. फिरण्याच्या बहाण्याने ते तिला रिक्षातून घेऊन गेले. काही वेळाने तिला नगीनदासपाडा येथील एका निर्जनस्थळी आणले. तेथे आळीपाळीने दोघांनी तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पीडीत मुलीने घरी जाऊन आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला.
मुलीने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पालकांनी पोलीसात धाव घेतली. या प्रकरणी तुळींज पोलिसांनी दोन्ही आरोपींवर पॉक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आणि पीडित मुलीची केवळ चार ते पाच दिवसांची ओळख होती. तिला फिरण्याच्या बहाण्याने बोलावून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. या प्रकरणी आम्ही दोन्ही आरोपींना अटक केली आहे. अशी माहिती तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिली.