हिवाळी अधिवेशनादरम्यान PWDमध्ये लाखोंचा घोटाळा; तत्कालीन अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल, काय प्रकरण?

म. टा. प्रतिनिधी, नागपूर : हिवाळी अधिवेशनादरम्यान करण्यात आलेल्या कामांची श्रमिकांना देण्यात येणारी मजुरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपविभागीय अभियंत्याने परस्पर लाटून तब्बल ४२ लाखांचा घोटाळा केला. याप्रकरणी सदर पोलिसांनी अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

काय आहे प्रकरण?

१५ वर्षांपूर्वी डिसेंबर २००९मध्ये हा घोटाळा झाला. तोलीराम फुलाजी राठोडा ( रा. सिडको, छत्रपती संभाजीनगर ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या निवृत्त अभियंत्याचे नाव आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, तोलीराम हे २८ ऑगस्ट २००९ ते ७ जून २०११ या कालावधीत नागपुरातील सावर्जनिक बांधकाम विभागात ( पीडब्ल्यूडी ) उपविभागीय अभियंता होते. २००९ मध्ये हिवाळी अधिवेशानादरम्यान श्रमिकांकडून विविध कामे करवून घेण्यात आली . त्यांचे मजुरीचे तीन टप्प्यांत २४ लाख, २ लाख ४९ हजार ५९५ आणि १७ लाख रुपये मंजूर करण्यात आले. या रकमेचे धनादेश तोलीराम यांनी प्राप्त केले . धनादेश परस्पर वटवून एकूण ४२ लाखांचा घोटाळा केलाम. धनादेशाबाबतची नोंद कुठेही केली नाही.

क्रिकेटपटूवर हत्येचा गुन्हा दाखल; परदेशात कसोटी खेळणाऱ्या स्टार खेळाडूला आता मायदेशात जाता येईल?
२०११मध्ये हा घोटाळा उघडकीस आला

१५ वर्षांपूर्वी डिसेंबर २००९मध्ये हा घोटाळा झाला. २०११मध्ये दक्षता व गुण नियंत्रण समितीने केलेल्या तपासणीदरम्यान हा घोटाळा उघडकीस आला. तोलीराम यांची विभागीय चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात आले. विभागीय चौकशीत ४२ लाखांचा अपहार झाल्याचा अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर लोकलेखा समितीने तोलीराम दोषी असल्याचा अहवाल दिला . त्या अहवालाच्या आधारे कनिष्ठ अभियंता सचिन भोंगळे यांनी सदर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अपहाराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Source link

nagpur winter sessionnagpur winter session 2009pwd departmenttoliram rathod caseनागपूर बातम्यालोकलेखा समितीसावर्जनिक बांधकाम विभाग
Comments (0)
Add Comment