भावाला भेटून परतताना घात, कार अन् एसटी बसची धडक; पुण्यात अपघातात महिला अधिकाऱ्याचा मृत्यू

पुणे : खडकी रेल्वे स्थानकाजवळ जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर रविवारी (२५ ऑगस्ट) सकाळी कार आणि एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात भूमिअभिलेख विभागात उपअधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या महिलेचा मृत्यू झाला, तर अधिकारी महिलेचे पती, भाऊ, एक दुचाकीस्वार आणि बसमधील प्रवासी असे चौदा जण जखमी झाले. या अधिकारी महिला चिखली येथून आपल्या भावाला भेटून घरी जात असताना हा अपघात झाला आहे.मनिषा विजयसिंह भोसले (वय ४०, रा. कवठे महंकाळा, जि. सांगली) असे मृत्यूमूखी पडलेल्या अधिकारी महिलेचं नाव आहे. मनीषा भोसले यांची नुकतीच पुरंदर येथील भूमी अभिलेख कार्यालयात अधिकारी म्हणून बदली झाली होती. यासंदर्भात त्यांच्या निकटवर्ती यांनी ही माहिती दिली आहे. या प्रकरणी खडकी पोलिसांनी एसटी बस चालकाला अनंत पंजाबराव उईके (वय ३३, रा.नारायणगाव) याला ताब्यात घेतलं असून, खडकी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Vasant Chavan Death : नांदेडचे काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांचे निधन, हैदराबादमधील रुग्णालयात अखेरचा श्वास

मनीषा विजयसिंह भोसले (वय ४०, मूळ रा. कवठे महांकाळ, सांगली) असे मृत्यू झालेल्या अधिकारी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, बसचालक अनंत पंजाबराव उईके (वय ३३, रा. नारायणगाव) याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा भोसले, त्यांचे पती आणि भाऊ रविवारी सकाळी पावणे नऊच्या सुमारास कारमधून हडपसरकडे जात होते. त्यांचा भाऊ गाडी चालवित होता. पती चालकाशेजारील सीटवर बसले होते. मनीषा चालकाच्या मागील सीटवर बसल्या होत्या. त्यांची कार खडकी रेल्वे स्थानक परिसरात आली, तेव्हा समोरून येणाऱ्या एसटी बसने त्यांच्या कारला जोरात धडक दिली. त्यात गाडीतील तिघे जखमी झाले. मनीषा गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पती आणि भावावर उपचार सुरू आहेत.

कारसह एसटी बसची दुचाकीला धडक बसली. तो दुचाकीस्वार जखमी झाला आहे. बसधील प्रवासीही जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात एकूण १४ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघातात बसचे व कारचे मोठे नुकसान झाले आहे.

Source link

khadki railway station accidentPune Accident Newspune breaking newspune land records female officer deathखडकी रेल्वे स्टेशन अपघातपुणे अपघात बातम्यापुणे ब्रेकिंग बातम्यापुणे भूमि अभिलेख महिला अधिकारी मृत्यू
Comments (0)
Add Comment