Dahi Handi Wishes 2023: जल्लोष उत्साहात होणार गोपाळकाला साजरा, नातलगांना द्या दही हंडीच्या खूप खूप शुभेच्छा

Dahi Handi Wishes in Marathi: यंदा गुरुवार ७ सप्टेंबर २०२३ रोजी दहीहंडी हा उत्सव साजरा होत आहे. भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री झाला, म्हणून जन्मोत्सव साजरा करण्यासाठी दुसऱ्या दिवशी दिवसभर उत्सव साजरा करतात. गोकुळाष्टमीला (श्रीकृष्ण जन्माष्टमी) धरलेला उपवास दहीकाल्याचा प्रसाद घेऊन दुसऱ्या दिवशी म्हणजे दहीहंडीच्या दिवशी सोडतात. यावर्षी हा उत्सव खूप उत्साहात साजरा होईलच सोबतच शुभेच्छाही देऊया, त्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश. वाचा आणि पाठवा.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
दहीहंडी शुभेच्छा
श्रीकृष्णाला बालपणी दही, दूध, लोणी या पदार्थांची आवड होती. कृष्णापासून दह्याचे रक्षण व्हावे यासाठी यशोदा दह्याची हंडी उंच ठिकाणी किंवा शिक्यावर ठेवत असे पण श्रीकृष्ण तिथपर्यंत पोहचण्यात यशस्वी होत असे. यासाठी त्याचे, मित्र त्याला मदत करत असत. या घटनेची आठवण म्हणून सर्वत्र दहीहंडीचा उत्सव साजरा केला जातो. यावर्षी हा उत्सव खूप उत्साहात साजरा होईलच सोबतच शुभेच्छाही देऊया, त्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश. वाचा, स्टेटस ठेवा आणि पाठवा.

“हातात घेऊनी बासरी आला कृष्ण
थरावर थर रचून झाले मित्र सज्ज
मटकी फोडू, खाऊ लोणी
गोविंदा रे गोपाळा गाऊ गाणी
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा”

“दह्यात साखर, साखरेत भात
उंच दहीहंडी उभारुन
देऊ एकमेकांना साथ
फोडू हंडी लावून थरावर थर
जोशात साजरा करु आज
गोपाळकाल्याचा सण
गोपाळकाल्याच्या हार्दिक शुभेच्छा!”

“तुझ्या घरात नाही पाणी
घागर उताणी रे गोपाळा
गोविंदा रे गोपाळा,
यशोदेच्या तान्ह्या बाळा
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा..!”

“फुलांचा हार
पावसाची सर
राधा-कृष्णाच्या प्रेमाला आली बहर
साजरा करुया गोपालकाल्याचा सण!
दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा!”

“जल्लोषात आणि आनंदात
चैतन्याची फोडा हंडी
दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा!”

लेखकाबद्दलप्रियंका वाणीमहाराष्ट्र टाइम्स मध्ये भविष्य सेक्शनसाठी कंन्टेंट रायटर म्हणून २ वर्षापासून काम करत आहे. वैदिक ज्योतिष, आर्थिक भविष्य, राशीभविष्य, अंक ज्योतिष, टॅरो कार्ड, पंचांग, धार्मिक विषय आणि, सण उत्सवासंबंधी अचुक माहिती घेऊन ज्ञान आणि अनुभवानुसार योग्य माहिती वाचकांपर्यंत पोहचवते. इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनल मध्ये काम करण्याचा अनुभव आहे, वॉइस ओवर देण्याचाही अनुभव आहे. वाचन करण्याची आवड आहे. धार्मिक, आध्यात्मिक कथा वाचणे आणि स्वरचित कविता लिहीण्याचीही आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Dahi Handi chya shubhechaDahi Handi WishesDahi Handi Wishes 2023gopalkalaदहीहंडीदहीहंडीच्या शुभेच्छा २०२३
Comments (0)
Add Comment