Uday Samant: रत्नागिरीत आणखी एक मोठा प्रकल्प लवकरच; उदय सामंतांची घोषणा

रत्नागिरी : ‘टाटा उद्योगसमूह आणि एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे कौशल्य केंद्र रत्नागिरीमध्ये उभारले जाणार आहे. १९१ कोटी रुपयांचा हा प्रकल्प केवळ रत्नागिरीसाठीच नव्हे, तर अवघ्या कोकणातील तरुणांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे’, असे प्रतिपादन उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी रविवारी रत्नागिरीतील शिरगाव येथे या प्रकल्पाच्या भूमिपूजनप्रसंगी केले.‘कौशल्य केंद्रापाठोपाठ आता रत्नागिरी येथे येत्या आठ दिवसांमध्ये आणखी एक मोठा प्रदूषणविरहित रोजगारनिर्मिती करणारा प्रकल्प येणार आहे. त्यासाठी याच तालुक्यात एक हजार एकर जागा देण्याचे ‘एमआयडीसी’ने निश्चित केले आहे’, अशी घोषणा उद्योगमंत्र्यांनी यावेळी केली. सेमी कंडक्टर प्रकल्पही रत्नागिरीत येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.

शिरगाव ग्रामपंचायत हद्दीतील चंपक मैदानाजवळ या प्रस्तावित कौशल्य केंद्राकरिता ‘एमआयडीसी’तर्फे ४,०९५ चौ. मी. क्षेत्रफळाचा भूखंड उपलब्ध करून देण्यात आला आहे. दरवर्षी विविध प्रकारच्या १,५६० प्रशिक्षणार्थीना या केंद्रात प्रशिक्षण देण्यात येईल. यामध्ये विविध क्षमता केंद्रे व त्या अंतर्गत १७ प्रशिक्षण अभ्यासक्रम तीन महिने कालावधीकरिता प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी टाटा उद्योगसमूह १६० कोटी रुपये खर्च करणार आहे, तर एमआयडीसी ३६ कोटी रुपये खर्च करणार आहे. या प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्याकरिता पदवी / पदविका / आय. टी. आय. या शैक्षणिक पात्रता आवश्यक असल्याचे उद्योगमंत्री म्हणाले. प्रशिक्षणाकरिता चौथ्या, पाचव्या व सहाव्या वर्षासाठी एकूण रुपये ३६.७९ कोटी इतका खर्च महामंडळातर्फे जमा करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त या प्रकल्पासाठी प्रती वर्ष २५.४० लाख रुपये इतका खर्च देखभाल व दुरुस्तीसाठी केला जाणार आहे, अशीही माहिती उद्योगमंत्री सामंत यांनी दिली.

आम्हीसुद्धा महायुतीत पण..; निवडणुकीआधीच कोकणात शिमगा; भाजपचे माजी आमदार उदय सामंतांवर नाराज
या कार्यक्रमाला सह मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी, टाटा टेक्निकलचे कौलगुड, रवी राठोड, प्रीतम गंजेवार, मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण, अधीक्षक अभियंता भांडेकर, तहसीलदार राजाराम म्हात्रे, शिरगावच्या सरपंच फरीदा काझी, उपसरपंच अल्ताफ संगमेश्वरी, परेश सावंत, शकील मोडक, वंदना खरमाले, सचिन राक्षे आदी उपस्थित होते.

Source link

maharashtra largest skill centerratnagiri new projectUday SamantUday Samant Latest Newsटाटा उद्योग समूहपालकमंत्री उदय सामंतमहाराष्ट्रातील सगळ्यात मोठे कौशल्य केंद्ररत्नागिरी बातम्या
Comments (0)
Add Comment