सालोड येथील हिरापूर गावात ही घटना घडली आहे. सूरज चिंदूजी बावणे, वय २७ वर्षे आणि सेजल किशोर बावणे वय १३ वर्षे अशी मृतक तरुणांची नावे आहेत. आपली तरुण मुलं गमावलेने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले.
सोमवारी जन्माष्टमी असल्याने या तरुणांना मोठी ऑर्डर मिळाली होती. त्यासाठी त्यांनी नवीन डीजे आणला होता. या नव्या डीजेचा सेटअप तयार करून त्यांनी विद्युतजोडणी सुरू केली. याकरिता विद्युततारांवरून थेट विद्युत पुरवठा घेण्याच्या प्रयत्नात असतानाच सूरज व सेजल या दोघांना जोरदार विजेचा धक्का बसला. दोघेही विद्युत तारांना चिकटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्रभर ते तारांना चिकटलेल्या अवस्थेतच होते. सकाळी घरच्यांनी तेथे जाऊन पाहिल्यावर त्यांच्या निदर्शनास पडले. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी सावंगी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
धुळ्यातही तरुणासोबत धक्कादायक घटना
पोहता येतं का? असे मित्रांनी विचारल्यावर तरुणाने थेट पुराच्या पाण्यात उडी घेतली आणि तो पाण्याच्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमीन पिंजारी असं वाहून गेलेल्या तरुणाचं नाव आहे. तो सध्या बेपत्ता असून त्याचा शोध घेतला जात आहे. शहराच्या मधोमध वाहणाऱ्या पांजरा नदीत पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुराच्या पाण्यात पोहता येतं का? असं मित्रांनी विचारलं आणि अमीनने थेट पुराच्या पाण्यातच उडी घेतली. यादरम्यान त्याला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो वाहून गेला आहे.