गोरखपूर येथून शनिवारी रात्री निघालेल्या भुसावळचे प्रवासी रविवारी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास भोपाळ स्थानकावर पोहोचले तेथे भाजप कार्यकर्त्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी स्थानकावर येत प्रवाशांची भेट घेतली. सर्वांना पाणी बॉटल,चहा, कॉफी आणि बिस्किटांची व्यवस्था केली. सर्वांना धीर देत प्रवासाचे मनोबल वाढविले विशेष पोस्ट मधून आरपीएफचे कर्मचारी लक्ष ठेवत होते. दरम्यान अपघाताचे विदारक दृश्य पाहून दुसऱ्या लक्झरी बसमधील सर्व प्रवासी बेदरलेले होते. परतीचा प्रवास सुरू केला केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी गोरखपूर येथून विशेष एसी कोच उपलब्ध करून दिल्याने प्रवास सोयीचा झाला मात्र अपघातात आमचे सोबती गमवल्याने मन खिन्न झाले आहे. सारख्या स्मृती दाटून येत आहेत असे प्रवासी प्रमोद सरोदे यांनी भावूक होत सांगितले.
गोरखपूरला सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली
आंबुखैरी येथे शुक्रवारी मुक्कामी असलेल्या प्रवाशांनी शनिवारी सकाळी परतीचा प्रवास सुरू केला. सायंकाळी सात वाजता गोरखपूरला पोहोचले तेथील प्रशासनाने सर्व ४८ प्रवाशांची आरोग्य तपासणी केली. दोन ते तीन जणांवर गरजेनुसार प्राथमिक उपचार करण्यात आले त्यांना तेथे जेवण आणि चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली मात्र भीषण दुर्घटनेत २५ सोबत असलेल्या प्रवास यांना गमवल्याने सर्वांनी जेवणास नम्रपणे नकार दिला. अधिकारी आणि प्रशासनाने प्रत्येकाने किमान दोन घास अन्न खावे अशी विनंती करून जेवण दिल्याचे प्रवासी प्रमोद सरोदे यांनी सांगितले.
रेल्वे स्थानकावर पोहोचताच डी आर एम पांडे यांनी दिली भेट, कुली बांधवांनी मोफत वाहून दिला प्रवाशांचे सामान
प्रवाशांचे रात्री नऊ वाजता रेल्वेस्थानकावर आगमन होतात डीआरएम इथे पांडे यांच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली त्यानंतर तळवेल वरणगाव येथील ४६ आणि यावलच्या दोन प्रवाशांना थेट घरापर्यंत सोडण्याची वाहनाची व्यवस्था करून दिली तत्पूर्वी वृद्ध प्रवाशांना स्थानकाबाहेरील वाहनापर्यंत जाण्यासाठी बॅटरी चलीत कार उपलब्ध करून दिले. विशेष म्हणजे लालवर्दी कुली युनियनने सामान वाहून नेण्यासाठी या प्रवासांना मोफत सेवा दिली हे कौतुकाचे आहे.
सध्या नेपाळमध्ये १६ भाविकांवर उपचार सुरू
नेपाळ येथे बस अपघातात १६ प्रवासी जखमी झाले आहेत. ,सर्व प्रवाशांवर नेपाळ येथे उपचार सुरू आहे. सध्या १६ पैकी सात भाविकांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. आज विमानाने मुंबई येथे येणार. तर राहिलेले नऊ भाविकांना त्यांची परिस्थिती बघून त्यांना देखील एक दोन दिवसात सुट्टी मिळणार आहे. तसेच एक भाविक यांची परिस्थिती खालावली होती. मात्र आता ती चांगल्या परिस्थितीमध्ये आहे त्यामुळे याच ठिकाणी जखमी प्रवासी सर्व व्यवस्थित असल्याची माहिती भाजपाचे रावेर लोकसभेचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांनी दिली आहे. त्या ठिकाणी जखमी प्रवाशांसोबत हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत.