लोकसभेला फूट, विधानसभेला त्याचीच पुनरावृत्ती? उघड उघड दोन गट!

महेश पाटील, नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा येथे शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. मात्र या मेळाव्याला संपर्कप्रमुख, शिवसेनेचे दोन्ही जिल्हाप्रमुखांसह अनेक नेते अनुपस्थित राहिल्याने विधानसभेपूर्वीच जिल्ह्यात शिंदे शिवसेनेत दोन गट पाहायला मिळत असल्याची चर्चा रंगली आहे.

अक्कलकुवा येथे विधान परिषद उपसभापती तसेच शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत अक्कलकुवा शहराजवळील सोरापाडा येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा मेळावा आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी धडगाव व अक्कलकुवा तालुक्यातील लाभार्थी महिलांना आमंत्रित केले होते. या कार्यक्रमाचे आयोजन आमदार आमश्या पाडवी यांनी केले होते. मात्र या कार्यक्रमाला जिल्ह्यातील शिंदे शिवसेनेचे नेते संपर्कप्रमुख प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना जिल्हाप्रमुख राम रघुवंशी, किरसिंग वसावे, विजय पराडके आदी नेत्यांनी दांडी मारली. त्यामुळे विधानसभेपूर्वीच शिंदे शिवसेनेत दोन गट पडल्याची चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.
Rajesh Padvi : मला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय, आमदार राजेश पाडवी भाजपमध्येच राहणार

एकाच वेळी दुसरी बैठक

अक्कलकुवा येथे शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत महिला मेळावा असताना त्याचवेळी धडगाव येथे विधानसभेचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांनी या योजनेचा राज्यात प्रसार व प्रचार करीत असताना शिंदे शिवसेनेचे नेत्यांनी मात्र या मेळाव्यात अनुपस्थित राहिल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत नीलम गोऱ्हे यांना पत्रकार परिषदेत नेत्यांच्या उपस्थितीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांची दुसरी बैठक होती, असे सांगत यावर अधिक भाष्य करण्याचे टाळले.
MH Election 2024 : नंदुरबार लोकसभेतील सहाही जागांवर काँग्रसने ठोकला दावा, उत्तर महाराष्ट्र विभागातील काँग्रेसच्या मेळाव्यात मागणी

लोकसभेपासूनच दोन गट

लोकसभेच्या निवडणुकीत शिंदे शिवसेनेचे दोन गट पाहायला मिळाले. चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वातील एका गटाने काँग्रेसला मदत केली. तर आमदार आमश्या पाडवी यांनी भाजपच्या डॉक्टर हिना गावित यांचा प्रचार केला. त्यामुळे एक गट भाजप जवळ तर दुसरा काँग्रेस जवळ असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.
Nandurbar Rain Update: जिल्ह्यात पावसामुळे तिघांचा मृत्यू, ४२ घरांची पडझड; अनेक गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

विधानसभेपूर्वी दोन गट, पक्षाला धोका

अक्कलकुवा-अक्रानी या विधानसभा मतदारसंघात मागील विधानसभेत शिवसेनेला झटका बसला होता. आमश्या पाडवी यांना थोड्या अंतराने पराभव स्वीकारावा लागला. विधान परिषदेच्या आमदारकीसाठी चंद्रकांत रघुवंशी उत्सुक असताना आमश्या पाडवी यांना आमदारकीची संधी मिळाली. त्यानंतर शिवसेनेत फूट पडल्यानंतर काही दिवसातच चंद्रकांत रघुवंशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. त्यादरम्यान आमश्या पाडवी यांनी चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर अनेकदा टीका केली. काही कालावधीनंतर आमश्या पाडवी हेही एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले.

दरम्यान, विधानसभा जशी जशी जवळ येऊ लागलीये तसतसे अक्कलकुवा- अक्रानी येथील वातावरण तापायला लागले असून अक्कलकुवा शहरात आमश्या पाडवी यांचे पुत्र जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती शंकर पाडवी यांचे भावी आमदार म्हणून बॅनर झळकले. तर धडगाव येथील जिल्हा परिषद सदस्य विजय पराडके हेही विधानसभेच्या तिकिटासाठी इच्छुक आहेत. असे असले तरी शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात नेत्यांची अनुपस्थिती बरेच काय सांगून जात आहे.

Source link

ladki bahin yojananandurbar Eknath Shinde groupnandurbar Ladki Bahin Yojana programnandurbar Shiv Senaneelam gorheनंदूरबार शिवसेनानंदूरबार शिवसेना नेत्यांमध्ये फूटनीलम गोऱ्हेलाडकी बहीण योजना
Comments (0)
Add Comment