सुप्रिया सुळे म्हणाल्या,
छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळा स्मारक कोसळणे ही अतिशय दुदैवी घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. त्यांचे स्मारक उभे करताना राज्य शासनाने ऊन, वारा, पाऊस याचा विचार केला नव्हता का ? या सरकारचा मी निषेध करते. पंतप्रधानांना उदघाटनाला बोलावता मग पुतळा उभा करताना राज्य सरकारने याचा विचार केला नव्हता का, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.
आमदार ॲड.यशोमती ठाकूर म्हणाल्या,
हे सरकार म्हणजे टक्केवारीचे सरकार आहे. यांना प्रत्येक गोष्टीत केवळ पैसे खाणे इतकेच दिसते. देशाच्या पंतप्रधानांनी ज्या पुतळ्याचे अनावरण काही महिन्यांपूर्वीच केले होते तो छत्रपती शिवरायांचा पुतळा पडतोच कसा? टक्केवारी खाऊन तुम्ही छत्रपती शिवरायांचा पुतळा ही निकृष्ट दर्जाचा उभा केलात हे यावरून स्पष्ट झाले आहे. महायुती सरकारच्या खाबुगिरीचा हा उत्कृष्ट नमुना असून यामुळे छत्रपती शिवरायांचा अपमान या सरकारने केला आहे असा आरोप ॲड. ठाकूर यांनी केला.
विनायक राऊत काय म्हणाले,
सरकारच्या भ्रष्टाचारी वृत्तीमुळे आणि नरेंद्र मोदी यांच्यासमोर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना चमकोगिरी करावयाची असल्या कारणाने अत्यंत घिसाडघाई करून निकृष्ट दर्ज्याचे काम केल्याने. आज मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे. सदरप्रकरणी तातडीने संबंधितांवर फौजदारी गुन्हा नोंदवून प्रकरणाची चौकशी करावी व दोषींवर कठोर कार्यवाही करण्यात यावी. अशी मागणी मा. खासदार तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते श्री विनायकजी राऊत यांनी केली आहे.
तर दुसरीकडे मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे हा राजकीय कट असल्याचा भाजपने आरोप केला आहे. सरकारला बदनाम करण्यासाठी घटना घडवली आहे, सीसीटीव्ही फुटेजसह सॅटॅलाइट फुटेज तपासण्याची मागणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी केली आहे. सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधकांनी प्रयत्न केला असावा अशी शक्यता काळसेकरांनी मांडली आहे.राज्याच्या गृह खात्याने आणि केंद्रीय गृह खात्याने चौकशी करावी असे काळसेकर म्हणाले.
मंत्री रविंद्र चव्हाणांनी दाखल केला गुन्हा
शिवरायांचा पुतळा नौदलाच्या अखत्यारीत येतो.त्यांनीच पुतळ्याची उभारणी केली होती.यासंदर्भात मेसर्स आर्टीस्ट्री नावाच्या कंत्राटीला काम देण्यात आले होते. जयदीप आपटे कंपनीचे प्रोप्रायटर आहेत तर चेतन पाटील स्ट्रक्चरल कन्सल्टंट म्हणून काम पाहत होते. समुद्र किनारी असलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या नटबोल्टला गंज लागत असल्याचेही निदर्शनास आले होते. त्यानंतर २० आगस्ट रोजी सार्वजनिक बांधकाम विभागानं पत्र लिहून नौदलाच्या निदर्शनास आणून दिले होते. या प्रकरणीसंबंधितांवर गुन्हा दाखल व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण मालवण पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलीय.शिवरायांच्या पुतळ्यासंदर्भात केलेली हलर्जी सहन केली जाणार नाही. तातडीनं यावर कारवाई करून येत्या दोन महिन्यांत पुन्हा शिवरायांचा पुतळा बसविण्यात येईल.