Mumbai Goa Highway : ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा CM शिंदेंचा आदेश

रायगड, नवी मुंबई : गेल्या १८ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी राज्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी पनवेल येथील पळस्पे फाटा येथून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पाहणी केल्यानंतर, ‘हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा,’ असे आदेश दिले आहेत. गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रलंबित कामाचा आढावा घेण्यासाठी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणांना भेट दिली. यावेळी गणेशोत्सवापूर्वी हाच महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. रामदास कदम यांनी भाजप नेते आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना, महामार्गाच्या दुरवस्थेबद्दल ‘निरुपयोगी मंत्री’ म्हटल्यानंतर आठवडाभराने मुख्यमंत्र्यांनी महामार्गावरील कामाचा आढावा घेतला आहे.
कदम आणि चव्हाणांच्या वादाचे देणेघेणे नाही, मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करा; वैभव नाईकांची मागणी

पत्रकारांशी बोलताना सीएम शिंदे म्हणाले, महामार्गावरील खड्डे आणि खराब झालेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी आम्ही चार प्रकारचे प्रगत तंत्रज्ञान वापरले आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लोकांची गैरसोय कमी होईल. नाशिक महामार्गावर वापरलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपण मुंबई गोवा महामार्गावरही करणार आहोत. या महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी जीओपॉलिमर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. हेच तंत्रज्ञान आम्ही नाशिक महामार्गावरदेखील वापरले होते अशी माहिती त्यांनी दिली. याआधी, मुंबई- गोवा महामार्गावर असणाऱ्या खड्ड्यांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळून, नागरिकांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासोबत जिल्हा प्रशासनाने समन्वयाने काम करावे. तसेच महामार्गावरील बायपास, सर्व्हिस रोड यांचे मजबुतीकरण करुन गणेशोत्सवापूर्वी मुंबई- गोवा महामार्ग आणि मुंबई- नाशिक महामार्ग खड्डेमुक्त करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते.

रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तसेच खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरु आहे. गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा मानस मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला. रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तसेच खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे. पहिली टेक्नॉलॉजी एम 60 आरएफसी आणि लिओ पॉलिमर पद्धत, दुसरी रॅपिडेक्स हार्डनर एम 60 पद्धत आणि तिसरी डीएलसी पद्धत या तीन आधुनिक पद्धतींनी रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे ब्रिक्स कास्ट एम 60 या पद्धतीचाही उपयोग करण्यात येत आहे. या पद्धतीमध्ये सिमेंटच्या तयार प्लेट्स बसवून रस्ता तयार करण्यात येत आहे.या माध्यमातून मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा तसेच उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी संपूर्ण टीम काम करीत आहे असे शिंदे म्हणाले..

Source link

mumbai goa highway updatemumbai goa road newsमुंबई गोवा महामार्ग अपडेटमुंबई गोवा रस्ता न्यूजमुंबई गोवा हायवेमुंबई-गोवा महामार्गरविंद्र चव्हाणसीएम शिंदे
Comments (0)
Add Comment