ज्यांना विधानसभेची उमेदवारी हवी त्यांनी अर्ज करा, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची ‘आघाडी’

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार पक्षातर्फे आगामी विधानसभा निवडणुकीत निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यांसाठी अर्ज भरुन घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांमार्फत हे अर्ज भरून घेण्यात येणार असून विहित शुल्कासह ५ सप्टेंबर २०२४ पर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून एक वर्ष झाले असून बहुतांशी आमदार हे अजित पवार यांच्या नेतृत्वात बाहेर पडले. त्यानंतर अजित पवार यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा गटालाच पक्ष म्हणून मान्यता मिळाली. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादील घवघवीत यश मिळाले होते. पक्षाने आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून ती लढविण्यास उत्सुक असलेल्या इच्छुकांनी अर्ज भरावे असे आवाहन करण्यात आले आहे.
Atul Benke : मनात ‘दादा’, विचारात ‘साहेब’, अतुल बेनके यांचं चाललंय काय? शरद पवारांच्या बॅनरमुळे चर्चा

जिल्हाध्यक्षांमार्फत अर्ज भरा आणि ५ तारखेपर्यंत सादर करा

पक्षाच्या जिल्हाध्यक्षांमार्फत हे अर्ज भरून घेण्यात येणार असून विहित शुल्कासह ५ सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रदेश कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी केले आहे.
भगीरथ भालके तुतारी फुंकणार, कागलनंतर पंढरपुरात धमाका, शरद पवार कुणाला उमेदवारी देणार?

घाटकोपरमध्ये राष्ट्रवादीचा युवा मेळावा, शरद पवार राहणार उपस्थित

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे युवा संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार १ सप्टेंबर रोजी घाटकोपर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा मेळावा होईल. मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार आहेत.

तरुणांमधील उत्साह कायम ठेवण्यासाठी थेट शरद पवारांचा संवाद

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे समाजातील विविध घटकांशी संवाद साधत प्रचार करण्यात येत आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तरुणांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तरुणांमधील हा प्रचंड उत्साह कायम ठेवण्यासाठी त्याचबरोबर राज्यातील तरुणांच्यासमोरील प्रश्नांबाबत थेट संवाद साधण्यासाठी, पक्षातर्फे युवा संवाद या मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्याला शरद पवार उपस्थित राहणार आहेत. रविवार १ सप्टेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ ते ९ दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अमृत नगर सर्कल, घाटकोपर (पश्चिम) येथे हा मेळावा होईल, अशी माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (शप) मुंबई अध्यक्ष अमोल मातेले यांनी दिली.

Source link

Jayant Patil Vidhan Sabha ElectionNCP led by Sharad PawarSharad Pawar NCP Planning For Vidhan Sabha ElectionVidhan Sabha Election 2024राष्ट्रवादी विधानसभा निवडणूक प्लॅनिंगविधानसभा निवडणूक २०२४शरद पवार
Comments (0)
Add Comment