माझं तिकीट कापलं… जावई तिकडे येऊन कब्जा करतात, भावना गवळी यांची टोलेबाजी

अर्जुन राठोड, नांदेड : विदर्भातील मुली निश्चितच चांगल्या आहेत. पण मराठवाड्यातील जावई मात्र तिकडे येऊन कब्जा करत आहेत, काही हरकत नाही, पण आमचं मन मोठं आहे. आम्ही त्यांची सरबराई करायला तयार आहोत, असे म्हणत शिवसेना शिंदे गटाच्या आमदार भावना गवळी यांनी माजी खासदार हेमंत पाटील यांना टोला लगावला.

नांदेड येथे रविवारी कुणबी मराठा महासंघाचा मेळावा संपन्न झाला. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मराठा-कुणबी समाजातील उद्योग क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. मागील पाच वेळा मी निवडून आली आहे. कदाचित यावेळी मी निवडून आली असती तर केंद्रात मंत्री राहिली असते, अशी खदखद देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Vasant Chavan: ”आज मी सच्चा मित्र गमावला”, वसंत चव्हाण यांच्या निधनाने प्रताप पाटील चिखलीकर हळहळले

भावना गवळी यांची टोलेबाजी

आमदार भावना गवळी पुढे म्हणाल्या की, विदर्भातील माणसे प्रेमळ असतात. म्हणूनच तर विदर्भातील मुली मराठवाड्यात जास्तीत जास्त आहेत. आपण सर्व सगे-सोयरे आहोत. त्यामुळे कुणबी सग्यासोयऱ्याचा विषयही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हाताळतील, अशी टोलेबाजी भावना गवळी यांनी केली. कुणबी मराठा समाजाच्या जितक्या काही मागण्या आहेत. त्या सर्व पूर्ण करण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेईन, असेही भावना गवळी म्हणाल्या.
भगीरथ भालके तुतारी फुंकणार, कागलनंतर पंढरपुरात धमाका, शरद पवार कुणाला उमेदवारी देणार?

…तर मी केंद्रात मंत्री राहिले असते

यवतमाळ-वाशीम मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या वेळी ऐनवेळी विद्यमान खासदार भावना गवळी यांच्या उमेदवारीचा पत्ता कापून हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी सौ. राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. तेव्हापासून भावना गवळी नाराज होत्या. त्यांची नाराजी दूर करण्याकरिता एकनाथ शिंदे यांनी त्यांना विधान परिषदेवर संधी दिली.

मला उमेदवारी मिळून मी जर निवडून आले असते तर केंद्रात मंत्री झाले असते, असे त्या म्हणाल्या. जाऊ द्या, केंद्रातले मंत्रिपद हुकले असले तरी राज्यात मंत्रिपद मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. मला कुणीही कितीही टार्गेट केले तरी मी थांबणार नाही. मी खंबीरपणे उभी राहणार आहे, असेही त्या आपल्या भाषणात म्हणाल्या.

Source link

Bhavana GawaliBhavana Gawali Taunt Hemant Patilhemant patillok sabha electionlok sabha election 2024भावना गवळीलोकसभा निवडणूकलोकसभा निवडणूक २०२४हेमंत पाटील
Comments (0)
Add Comment