पंतप्रधान मोदींना युक्रेनला जाण्यासाठी वेळ आहे,पण मणिपूरला जायला वेळ नाहीय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच युक्रेन दौरा संपन्न झाला.मोदींच्या युक्रेन दौऱ्यावर खा. प्रणिती शिंदें कडाडल्या.पंतप्रधानांना युक्रेनला जायला वेळ आहे,मात्र मणिपूरला जायला वेळ नाही.मणिपूर राज्यात आजही अशांतता आहे,महिलेला विवस्त्र करून त्याची धिंड काढली जाते,त्यावर ते काही बोलले नाही,त्यावरून हे सिद्ध होत आहे,सध्याची सरकार ही संवेदनशील नाही असा खोचक टोला खा.प्रणिती शिंदेंनी लगावला आहे.
तर कालच जळगावच्या सभेत पीएम मोदींनी बदलापूर आणि कोलकत्ता प्रकरणावर भाष्य केले आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधत मोदींनी थेट कडक शब्दात भूमिका मांडली. महिलांवर अत्याचार करणारा नराधम माफीस पात्र नाही. अशा घटनेतील आरोपीवर कडक कारवाई झाली पाहिजे. मी प्रत्येक राजकीय पक्ष आणि राज्य सरकारला सागू इच्छितो की, महिलांवर होणारे अत्याचार अक्षम्य असेल. कोणीही दोषी असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे. कोणीही आरोपीला पाठीशी घालण्याचे प्रयत्न करु नये. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणात दोषीला शिक्षा देण्यासाठी राज्य सरकारसोबत केंद्र सरकार सुद्धा दोषीला शिक्षा देण्यासाठी खांद्याला खांदा लावून उभे असेल.
नव्या भारतीय दंडन्यायसंहिता नुसार महिलांना आता घरबसल्या अत्याचाराविरोधात एफआयआर दाखल करता येणार आहे. त्यामुळे गुन्ह्याची एफआयआर लगेच नोंद होवून कारवाईला वेग येणार. महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकार नवे कायदे आणणार आहे अशी माहिती मोदींनी बोलताना दिली. स्वातंत्र्यनंतर जितके महिला सक्षमकरणासाठी मोदी सरकारने इतके काम केले आहे जितके आतापर्यंत कोणत्याच पक्षाने केले नसेल असे मोदी यांनी बोलून दाखवले.