मालेगाव महापालिकेचे १५ अधिकारी ACBच्या गळाला; २० लाखांचा घोटाळा उघड, काय प्रकरण?

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव : मालेगाव महापालिकेच्या आजी-माजी अधिकाऱ्यांसह १५ जणांवर २० लाखांच्या निधीचा अपहार केल्याप्रकरणी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. अलीकडेच महापालिका आयुक्तांवर एसीबीने कारवाई केली होती. त्यानंतर आता निधी अपहाराचे प्रकरण समोर आल्याने महापालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे. एकूण २० लाख ६८ हजार ६०७ रुपयांचा निधीचा अपहार केल्याचा ठपका या १५ जणांवर आहे.काय आहे प्रकरण?

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात महापालिकेचे शहर अभियंता कैलास बच्छाव यांच्यासह पाच निवृत्त अधिकारी, कर्मचारी व एका खासगी व्यक्तीचा समावेश आहे. या आरोपींपैकी एकाचा मृत्यू झालेला आहे.

गुन्हा दाखल झालेल्या १५ जणांनी स्वतःच्या पदाचा व अधिकारांचा दुरुपयोग करून त्यांना नेमून दिलेले काम केले नाही. बी. वाय. शहा फर्मचे ठेकेदार सोहेल अब्दुल रहेमान मासूमअली शाह यांनी केलेल्या विकासकामांचे कोणतेही मूल्यमापन न करता जाणीवपूर्वक प्रशासकीय जबाबदारी टाळून संबंधित ठेकेदारास स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महापालिकेची २० लाख ६८ हजार ६०७ रुपये अदा करून आर्थिक घोटाळा केल्याचे एसीबीच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे एकूण १५ आजी-माजी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक १९८८ चे कलम १३ (१) (अ) सह व भादंवि कलम ४०९, ४२०, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिवाळी अधिवेशनादरम्यान PWDमध्ये लाखोंचा घोटाळा; तत्कालीन अभियंत्याविरुद्ध गुन्हा दाखल, काय प्रकरण?
यांच्यावर गुन्हा दाखल

कैलास राजाराम बच्छाव (शहर अभियंता), मुरलीधर हरी देवरे (सध्या निवृत्त, तत्कालीन कनिष्ठ अभियंता), संजय जनार्दन जाधव (तत्कालीन कनिष्ठ अभियंता), राजेंद्र काशीनाथ बाविस्कर (सेवानिवृत्त, तत्कालीन उपअभियंता), सोहेल अब्दुल रहेमान मासुमअली शाह (खाजगी व्यक्ती), दिनेश आनंदराव जगताप (विभाग प्रमुख, केबीएच पालिटेक्निक, मालेगाव), नीलेश हिरामण जाधव (तत्कालीन कनिष्ठ लिपीक), अशोक ओंकार म्हसदे (तत्कालीन लेखापरीक्षक, सेवानिवृत्त), सुहास वसंत कुलकर्णी (तत्कालीन कनिष्ठ लिपीक), कमरूद्दीन शमशुद्दीन शेख (तत्कालीन लेखा अधिकारी, सेवानिवृत्त), सुनील दत्तात्रेय खडके (तत्कालीन कनिष्ठ लिपीक), मधुकर अशोक चौधरी (कनिष्ठ लिपीक, सेवानिवृत्त), उत्तम माधवराव कावडे (मुख्य लेखापरीक्षक, सेवानिवृत्त), केदा रामदास भामरे (कनिष्ठ लिपीक), कृष्णा वळवी (मृत, तत्कालीन उपायुक्त)

Source link

acb raid in malegaonembezzlement casemalegaon municipality embezzlement caseनाशिक बातम्यामालेगाव महानगरपालिकामालेगाव महापालिका भ्रष्टाचारलाचलुचपत प्रतिबंधक विभाग
Comments (0)
Add Comment