आई अन् चिमुकले एकमेकांना बांधलेले, पाण्यात तिघांचे कुजलेले मृतदेह, बुलढाण्यात खळबळ

बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पिंपरी गवळी येथील लघु प्रकल्पात दोन चिमुकल्यांसह एका आईचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. हा धक्कादायक प्रकार सोमवारी सायंकाळी उघडकीस आला आहे.

या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. महिलेचा मृतदेह सापडल्याची बातमी परिसरात लगेच वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. खामगाव ग्रामीण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. खामगाव तालुक्यातील पिंपरी गवळी येथील तलावात सोमवारी सायंकाळी दोन चिमुकल्यांसह मातेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत स्थानिकांना आढळून आला.
Pune Crime: क्रूरतेची हद्द! डोकं, हात-पाय कापून तरुणीचं धड नदीत फेकलं, पुण्यात अंगावर काटा आणणारी घटना

आईने चिमुकल्यांसह आत्महत्या केल्याचा संशय

या घटनेची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच खामगाव ग्रामीण पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. प्रथमदर्शी तीनही मृतदेह एकमेकांना कापडाने बांधलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे या आईने चिमुकल्यासह आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. स्थळ निरीक्षण आणि पंचनामा केल्यानंतर तीनही मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले. पुढील तपास पोलीस सूत्रांकडून सुरू असल्याची माहिती आहे.

याप्रकरणातील मृतांची नावं पार्वती प्रकाश इंगळे (वय वर्ष ३०), आर्यन प्रकाश इंगळे (वय वर्ष ८) आणि प्राची प्रकाश इंगळे (वय वर्ष ५) असे आहेत. याप्रकरणी मृतक महिलेचे वडील मुरलीधर गोंडू खंडारे आणि वर्षा (वय वर्ष ५२) राहणार जळका भडंग यांच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी बी एन एस एस कलम १८४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करत असल्याची माहिती आहे.

मृतांमध्ये महिला पार्वती इंगळे ही अकोला जिल्ह्यातील दहिगाव गावंडे येथे रहिवासी आहे. ती पतीपासून विभक्त होऊन पिंपरी गवळी येथे राहत होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ती मुलांसह घरून निघून गेली होती. दरम्यान, सोमवारी सायंकाळी मुलांसह या महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली. जर, त्यांनी आत्महत्या केली असेल तर ती का केली याचं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

Source link

Buldhanabuldhana crimebuldhana newsthree bodies foundबुलढाणा आईची मुलांसह आत्महत्याबुलढाणा आईसह चिमुकल्यांचा मृत्यूबुलढाणा तिघांचे मृतदेह सापडले
Comments (0)
Add Comment