घरी जायला रिक्षात बसली, त्याने पाणी दिलं अन् मग… रत्नागिरी अत्याचार प्रकरणात नवी माहिती

रत्नागिरी: शहरात बेशुद्धावस्थेत सापडलेल्या प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर अत्याचार झाल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोलकाता येथे आरजी कार हॉस्पिटलमध्ये ज्युनियर महिला डॉक्टरसोबत झालेला अत्याचार आणि हत्या प्रकरण, बदलापुरात चिमुकलींवर झालेला लैंगिक अत्याचाराने देश पेटून उठला. यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आहे. रत्नागिरी येथे एका १९ वर्षीय प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर रिक्षा चालकाने अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर तिच्या कॉलेजमधून घरी जाण्यासाठी रिक्षा केली. त्यानंतर वाटेत रिक्षा चालकाने तिला पाणी प्यायला दिले. ते पाणी जरा कडवट असल्याचं तिला वाटलं. त्यानंतर ती बेशुद्ध पडली. बेशुद्ध झाल्यानंतर रिक्षा चालकाने तिला निर्जनस्थळी नेले आणि तिच्यावर आत्याचार केला. त्यानंतर तिला तिथेच सोडून पसार झाला. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा पीडितेने तिच्या कुटुंबीयांना बोलावले. यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. मुलीच्या कुटुंबीयांनी सोमवारी पोलिसांत तक्रार दाखल केली.
Pune Crime: क्रूरतेची हद्द! डोकं, हात-पाय कापून तरुणीचं धड नदीत फेकलं, पुण्यात अंगावर काटा आणणारी घटना

रिक्षा चालकाने दिलेले पाणी कडवट

खासगी रुग्णालयात प्रशिक्षणार्थी परिचारिका म्हणून काम करणारी देवरुख तालुक्यातील ही तरुणी सोमवारी सकाळी देवरुखहून एसटीने रत्नागिरीला आली. साळवी स्टॉप येथे बसमधून उतरून ती रिक्षामध्ये बसली. रिक्षाचालकाने तिला पाणी प्यायला दिले, ते कडवट होते, असे तिने रुग्णालयात शुद्धीवर आल्यानंतर पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

‘तरुणीवर अत्याचार झाल्याची दाट शक्यता असून त्यादृष्टीने तपास सुरू आहे. तिची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर यासंदर्भातील माहिती समोर येईल. पोलिस रिक्षावाल्याच्या शोधात आहेत,’ असे रत्नागिरी जिल्हा अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान, या तरुणीवर सरकारी रुग्णालयात उपचार करण्यात आले. तिच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.

तरुणीवर अत्याचार, शहरात तीव्र पडसाद

या तरुणीवर अत्याचार झाल्याच्या घटनेचे शहरात तीव्र पडसाद उमटले. आरोग्य विभागाच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त करत काम बंद आंदोलन केले. ‘आम्ही तीन पाळ्यांमध्ये काम करतो, त्यासाठी दिवसा आणि रात्रीही प्रवास करतो. आमच्या आरोग्य क्षेत्रातील सहकारी आरोग्यसेविकेवर अत्याचार होत असेल, तर आम्ही सुरक्षित आहोत का?’ असा जाब या आरोग्य कर्मचाऱ्यांनी विचारला. जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समन्वय समितीची तातडीने बैठक होऊन आरोपीला अटक करेपर्यंत काम बंद आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र काही वेळाने काम बंद आंदोलन थांबवत, २४ तासांत संबंधित गुन्हेगाराला अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा त्यांनी दिली. सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिचारिका सध्या कामावर रुजू झाल्याल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

Source link

nursing student raped by rikshaw driverratnagiri nursing student raperatnagiri rape caseratnagiri sindhudurgratnagiri woman found on roadनर्स तरुणी रत्नागिरीत बेशुद्ध अवस्थेतपरिचारिका आंदोलनरत्नागिरी तरुणी बेशुद्ध अवस्थेतरत्नागिरी नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर बलात्काररत्नागिरी परिचारिका अत्याचाक
Comments (0)
Add Comment