पाच वेळा पराभूत, कुठेही जाऊ द्या… नितीनकाकांकडून मदन भोसलेंची खिल्ली!

संतोश शिराळे, सातारा : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजप नेते मदन भोसले यांची भेट घेतल्याने विधानसभेपूर्वी ते राष्ट्रवादीत प्रवेश करून वाई मतदारसंघातून अजितदादा गटाचे आमदार मकरंद पाटील यांना आव्हान देतील, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र त्यांच्या पक्षांतराच्या संभाव्य निर्णयाची खिल्ली उडवत आम्ही त्यांचे आव्हान मानतच नाही, अशी आक्रमक प्रतिक्रिया नवनिर्वाचित राज्यसभेचे खासदार नितीन पाटील यांनी दिली आहे.

महायुतीकडून राज्यसभेवर बिनविरोध खासदार म्हणून निवडून आलेले सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन तथा किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक संचालक नितीनकाका पाटील यांचे सातारा जिल्ह्यात शिरवळ-शिंदेवाडी येथे आगमन होताच पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. खासदार नितीन काका पाटील यांना पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच जेसीबीतून फुलांचा वर्षाव केला. खासदार नितीनकाका पाटील यांची साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट येथे कार्यकर्त्यांच्या गर्दीत पेढेतुला व जंगी स्वागत केले. याचवेळी त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.
Nitin Patil Rajya Sabha: दादाचा पक्का वादा, नितीन पाटील राज्यसभेवर जाणार, कोअर कमिटीच्या बैठकीत शिक्कामोर्तब!

मदन भोसले हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे, तुम्ही याकडे कसे पाहता? असे नितीन पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, मदन भोसले यांनी यापूर्वी पाच विधानसभेच्या निवडणुका लढवल्या आहेत. ते सलग पाच वेळा पराभूत झालेले आहेत. जर ते वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातून उभे राहिले तर काही फरक पडेल असे मला वाटत नाही. त्यामुळे कोण कुठे गेले? कोण कुठल्या पक्षात गेले त्यापेक्षा आमची राष्ट्रवादी काँग्रेस आज मजबूत आहे, असे प्रत्युत्तर देत येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याची आमची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठक VSI ची… शरद पवारांनी संधी साधली, हर्षवर्धन पाटील आणि विवेक कोल्हेंशी गुफ्तगू, तुतारी फुंकणार?

नितीन काका राज्यसभेवर, मदन दादा भोसले गट आक्रमक

माजी खासदार स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील यांचे पुत्र, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांना राज्यसभेची खासदारकी मिळाल्यानंतर वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला असून मदन दादा भोसले गट आक्रमक झाला आहे.
हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांची पुण्यात भेट, बंद दाराआड चर्चा, पक्ष सोडण्याच्या चर्चांवर फडणवीस म्हणाले…

मदन भोसलेंचा पुतण्या पवार गटातून विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक

माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे मित्र, माजी मंत्री काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी खासदार स्वर्गीय प्रतापराव भोसले यांचे पुत्र माजी आमदार मदन भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा लढवावी यासाठी आग्रही भूमिका घेतली आहे. मदन भोसले हे सध्या भाजपमध्ये आहेत.
भगीरथ भालके तुतारी फुंकणार, कागलनंतर पंढरपुरात धमाका, शरद पवार कुणाला उमेदवारी देणार?

प्रतापराव भोसले यांचा नातू व मदन भोसले यांचा पुतण्या यशराज भोसले यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेतली आहे. यशराज हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा विधानसभेचा उमेदवार असू शकतो. शिवाय याच मतदारसंघामधून लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसला सात हजार मतांची आघाडी मिळाली होती. यामुळे आगामी काळात राजकीय बदलाच्या हालचाली या मतदारसंघात जाणवू लागल्या आहेत.

मदन भोसले कोण आहेत?

सातारा जिल्ह्याच्या वाई मतदारसंघाचे माजी आमदार, कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे पुत्र. मुळगाव भुईंज (ता. वाई). मदन भोसले यांनी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्षपदही भुषविले आहे. भुईज येथील किसन वीर साखर कारखान्याचे ते अध्यक्ष होते. किसन वीर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी खंडाळा सहकारी साखर कारखाना उभारला आहे. तसेच त्यांनी जावळी तालुक्‍यातील कुडाळ येथील प्रतापगड कारखाना चालविण्यास घेतला आहे.

Source link

Madan BhosaleNitin kaka PatilRajya Sabha MP Nitin kaka PatilSharad PawarVidhan Sabha Election 2024नितीन पाटीलमदन भोसलेशरद पवार
Comments (0)
Add Comment