शिवाजी महाराजांचा खरा मावळा कोसळलेल्या पुतळ्याचे फोटो वायरल करणार नाही- फडणवीस

म. टा. विशेष प्रतिनिधी

छत्रपतींचा पुतळा कोसळण्याच्या दुर्घटनेनंतर पुतळ्याचे भग्न अवस्थेतील काही फोटो व्हायरल करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा हे फोटो व्हायरल करणार नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विरोधकांवर केली. महाविकास आघाडीचे थर बिथरले असून २०२४ च्या विधानसभंची हंडी आम्हीच फोडणार, असा दावाही त्यांनी केला.

दहीहंडीच्या निमित्ताने उप मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबईतील, ठाण्यातील ठिकठिकाणच्या दहिहंडी उत्सवाला हजेरी लावली. त्यावेळी ते बोलत होते. सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली होती.या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लक्ष्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे ही दु:खदायक घटना आहे. यावर कोणीही राजकारण करु नये. पुतळा उभारताना राजकोट किल्ल्यावरील वाऱ्यांचे आकलन शिल्पकाराला करता आले नसावे. आता आम्ही नौदलाच्या मदतीने त्याचठिकाणी नवा पुतळा उभारू. पण या दुर्घटनेनंतर पुतळ्याचे भग्न अवस्थेतील काही फोटो व्हायरल करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा मावळा हे फोटो व्हायरल करणार नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर केली.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, त्या पत्राची दखल घेतली असती तर…

अफझलखानासारख्या कितीही प्रवृत्ती चालून आल्या तरी आम्ही लोकशाही पद्धतीने त्यांचा कोथळा बाहेर काढू, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले. जे श्रीकृष्णाला मानतात तेच २०२४ विधानसभेची हंडी फोडणार. महाविकास आघाडीचे थर बिथरले आहेत. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन राजकारण करु नये. मालवणमध्ये याहीपेक्षा मोठा पुतळा बसवू, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता यांच्या तक्रारीनंतर दोन व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ४ डिसेंबर २०२३ या पुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली होती आणि त्यानंतर काही दिवसातच म्हणजे १२ डिसेंबर रोजी छत्रपती संभाजी राजे यांनी मोदींना पत्र लिहून याबाबत माहिती दिली होती.

Source link

Devendra FadnavisShivaji Maharaj Statue Collapsedshivaji maharaj statue collapsed in sindhudurgउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसराजकोट किल्लाशिवाजी महाराजांचा पुतळा
Comments (0)
Add Comment