Rajkot Fort Shivaji Maharaj Statue : पवार साहेबांनी किती देवळं बांधली सांगा, नारायण राणेंचा शरद पवारांवर हल्लाबोल

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर येथे उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आलं होतं. पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेवरून विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. अशातच आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी थेट शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे.

शरद पवारांनी किती देवळं बांधली

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणावरून राज्य सरकारवर टीका केली होती. यावरुनच नारायण राणे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. ते म्हणाले की, ” शरद पवार साहेबांनी किती मंदिरे बांधली आहेत हे मला सांगा, यांना चांगलं काहीच दिसत नाही. मेलेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खाणारे हे लोक आहेत. तर राहुल गांधी यांच्यावर टीका करताना राहुल गांधी यांचा धर्म कोणता आहे हेच कळत नाही. असं म्हणत टोला लगावला आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे नटबोल्ट गंजल्याचं पत्र नौदलाला आधीच दिलेलं, अपघातानंतर नवी माहिती समोर

घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी

नारायण राणे म्हणाले की, ”घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मी उद्या १२ वाजता घटनास्थळी जाऊन पाहणी करणार असून त्यानंतर पत्रकार परिषद घेणार आहे. काल एक निष्ठावंत आमदार बांधकाम विभागाचे ऑफिस बंद झाल्यानंतर फोडण्यासाठी गेला होता. तो सकाळी मातोश्रीवर असतो तर संध्याकाळी एकनाथ शिंदे यांच्याकडे असतो असं म्हणत ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केली आहे.

दरम्यान, राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातील शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. घटनेनंतर अहिल्यानगरमध्ये मराठा समाजाच्या वतीने राज्य सरकारच्या विरोधात मोठे आंदोलने करण्यात आले आहे. साडे तीनशे वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या गडकिल्ल्यांना आणि तिथे असणाऱ्या पुतळ्यांना साधी चीर देखील पडलेली नाही. आणि राज्य सरकारने उभारलेला पुतळा ३६५ दिवसांच्या आतच कोसळला असं म्हणत संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.

Source link

Rajkot FortRajkot Fort Shivaji Maharaj statue collapsedrajkot newsshivaji maharaj statueShivaji Maharaj Statue Collapsed newssindhudurg newsनारायण राणे बातम्याशरद पवारशिवाजी महाराज पुतळासिंधुदुर्गसिंधुदुर्ग बातमी
Comments (0)
Add Comment