अब की बार, कोणीच नाही शंभरीपार; काँग्रेस नंबर वन, भाजप, पवार गटात चुरस; काय सांगतो सर्व्हे?

मुंबई: लोकसभा निवडणुकीत कोणाच्याही ध्यानीमनी नसताना काँग्रेसनं राज्यात १३ जागा निवडून आणल्या. गेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ १ जागा जिंकणाऱ्या काँग्रेसनं यंदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपचे तीन तेरा वाजवले. विदर्भ, मराठवाड्यात दमदार कामगिरी करुन काँग्रेसनं राज्यात जोरदार कमबॅक केलं. सांगलीत अपक्ष लढून विजयी झालेल्या विशाल पाटील यांनीही काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यानंतर आता पक्षानं विधानसभेसाठी कंबर कसली आहे. काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेमुळे पक्षात उत्साह संचारला आहे.

काँग्रेसनं केलेल्या सर्वेक्षणात पक्ष विधानसभेलाही सर्वात जास्त जागा जिंकेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विधानसभेला ८० जागा जिंकून काँग्रेस राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरेल असा कयास आहे. काँग्रेसच्या सर्व्हेनुसार, दुसऱ्या क्रमांकासाठी भाजप, शरद पवारांमध्ये चुरस असेल. तर त्यानंतरच्या क्रमांकासाठी उद्धवसेना आणि शिंदेसेनेत काँटे की टक्कर पाहायला मिळू शकते. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही निराशाजनक होण्याची शक्यता आहे. द न्यू इंडियन एक्स्प्रेसनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांची पुण्यात भेट, बंद दाराआड चर्चा, पक्ष सोडण्याच्या चर्चांवर फडणवीस म्हणाले…
विधानसभेच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये भाजपनं शंभरी ओलांडली. २०१४ मध्ये भाजपनं १२२ जागा जिंकल्या. तर २०१९ मध्ये १०५ जागांवर बाजी मारली. पण यंदा कोणत्याच पक्षाला शंभरीपार करता येणार नाही, असं काँग्रेसचा सर्व्हे सांगतो. त्यामुळे यंदाच्या विधानसभेला जबरदस्त संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहे. सत्ता स्थापनेसाठी १४५ हा जादुई आकडा आहे.
ओल्ड मॅन इज अगेन इन वॉर… शरद पवारांचा कॉन्फिडन्स वाढलाय आणि चेहऱ्यावरील तेजही!
लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजपनं केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणातूनही हीच बाब समोर आलेली आहे. जुलैमध्ये भाजपनं एक सर्व्हे केला. त्याचा तपशील ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात समोर आला. त्यानुसार भाजपला विधानसभा निवडणुकीत केवळ ५५ ते ६५ जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाची विधानसभा निवडणूक भाजपला जड जाऊ शकते.

गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं राज्यात २५ जागा लढवत २३ जागांवर यश मिळवलं. पण यंदा त्यांना २८ जागा लढवूनही केवळ ९ जागा जिंकता आल्या. काँग्रेसविरुद्धच्या थेट लढतींनी भाजपला नाकीनऊ आणले. विदर्भात पक्षाला केवळ २ जागा मिळाल्या. तर मराठवाड्यात पक्षाला भोपळाही फोडता आला नाही. पाच टर्मचे खासदार रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे यांच्यासारख्या दिग्गजांना पराभव पाहावा लागला.

Source link

congress internal surveyMaharashtra politicsshiv senavidhan sabha surveyvidhansabha nivadnuk 2024काँग्रेस महाराष्ट्रमहाराष्ट्र भाजपमहाराष्ट्र राजकीय बातम्याविधानसभा निवडणूक सर्व्हेशरद पवार
Comments (0)
Add Comment