एक्सवर फोटो शेअर करत दिली माहिती
कैलास मेघवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कैलास यांना भारताचे सरन्यायाधीश डी.व्हाय. चंद्रचूड यांनी एक मेसेज केल्याचं भासवलं जात आहे. आपण सरन्यायाधीश चंद्रचूड असून काही मदत हवी असल्याचं मेसेजमध्ये सांगण्यात आलं आहे.
फ्रॉड करणाऱ्याने काय लिहिलंय मेसेजमध्ये?
फ्रॉड मेसेज करणाऱ्याने कैलास मेघवाल यांना तो सरन्यायाधीश चंद्रचूड बोलत असल्याचं सांगितलं. मेसेजमध्ये लिहिलंय, एक तातडीची कॉलेजियमची मीटिंग आहे. मी दिल्लीच्या कॅनॉट इथे अडकलो आहो. त्यामुळे मला एका कॅबने येण्यासाठी ५०० रुपयांची गरज आहे. कोर्टात गेल्यावर पैसे परत करतो, असं आश्वासनही मेसेजमध्ये देण्यात आलं आहे.
या मेसेजनंतर फ्रॉड करणाऱ्याने कैलास यांना केलेला मेसेज खरा वाटावा यासाठी आणखी एक मेसेज केला. पैशांची गरज असल्याचा मेसेज केल्यानंतर फ्रॉड करणाऱ्याने आणखी एक Sent from iPad असाही मेसेज पाठवला. विशेष म्हणजे खोटा मेसेज पाठवणाऱ्याने डी.व्हाय.चंद्रचूड यांचा फोटोही लावला आहे.
फसवणुकीचा प्रयत्न झालेले कैलास यांनी २५ ऑगस्ट रोजी त्यांना आलेल्या मेसेजचा फोटो शेअर केला होता. त्यांनी ही पोस्ट ट्विटरवर शेअर केल्यापासून त्यांच्या पोस्टला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. आतापर्यंत २ लाख ट्विटर युजर्सनी त्यांची ही पोस्ट पाहिली असून २५०० लोकांनी पोस्टला लाईक करत अनेक प्रतिक्रिया केल्या आहेत.