समुद्रकिनारी कोश्यारींची टोपीही कधी उडाली नाही, शिवरायांचा पुतळा कसा पडला? ठाकरेंचा सवाल

सिंधुदुर्ग : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण कमालीचं तापलं आहे. महाविकास आघाडीचे नेते मालवण येथील राजकोट किल्ल्यावर पाहणी करण्यासाठी पोहोचले. यावर महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली आहे. ”शिवरायांचा पुतळा कोसळण्यासारखी घटना कधीही घडली नाही. महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस गाठलाय. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे समुद्रकिनारी राहत होते. त्यांनी देखील महाराजांचा अपमान केला होता. पण जोरदार वाऱ्याने राज्यपालांची टोपी उडाली असेल असं तरी माझ्या वाचनात आलेल नाहीय”, असं म्हणत ठाकरेंनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले उपस्थित होते.

सरकारला जोडेमारो आंदोलन करणार

हा पुतळा पडला कसा? असा सवाल ठाकरे यांनी यावेळी केला. त्याच्यापलीकडे जाऊन केसरकर म्हणाले की, काही वाईट घडलं तर त्यातून काही चांगलं घडेल. हे संतापजनक आहे. आम्ही असं ठरवलंय येत्या रविवारी दुपारी ११ वाजेच्या सुमारास हुतात्मा स्मारकाला वंदन करुन, तिथून आम्ही सगळेजण गेट वे ऑफ इंडियाला महाराजांचा पुतळा उभारलाय, त्या पुतळ्यासमोर आम्ही जमणार आहोत. तिथे आम्ही सरकारला जोडेमारो आंदोलन करणार आहोत. हा महाविकासआघाडीचा कार्यक्रम आहे. तसेच महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
राणे-ठाकरे समर्थक भिडले; जयंत पाटलांकडून मध्यस्थीचा प्रयत्न; पण एका मागणीनं परिस्थिती चिघळली

पुतळ्यातही कोट्यावधींचा भ्रष्टाचार

उद्धव ठाकरेंना मालवण राड्यावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, ”आता कोकणवासियांना समजलं असेल, गेल्या लोकसभेच्याआधी ज्या पद्धतीने मोदी तिथे आले होते. एक अभिमानाची गोष्ट आम्हाला वाटली होती की, कधी नव्हे तो नौदलदिन सिंधुदुर्गाच्या किनारी साजरा केला गेला. त्याचा अभिमान आम्हाला वाटलं होतं. पण हे केवळ श्रेय घेण्यासाठी आणि खिसाटघाईने तो पुतळा केला गेला त्या पुतळ्याबद्दल आता सर्व गोष्टी उघड होताय. तो शिल्पकार कोण होता, ती कंपनी होती, त्याच्यामध्ये ठाणे कनेक्शन होतं. या कामात देखील कोट्यावधींचं भ्रष्टाचार झालाय. यांच्या काराभाराची किळस यायला लागलीय, असंही ठाकरेंनी बोलून दाखवलं आहे.

Source link

aditya thackeraychhatrapati shivaji maharaj statue collapsedNarayan Ranesindhudurg clashesuddhav thackeray press conferenceआदित्य ठाकरेउद्धव ठाकरे पत्रकार परिषदछत्रपती शिवाजी महाराज पुतळानारायण राणेसिंधुदुर्ग क्लॅशेस
Comments (0)
Add Comment