दहीहंडी अन् श्रेयवादाचं ‘लोणी’, हेच आमचे भावी आमदार, शिंदेंच्या शिलेदाराच्या नावे घोषणा

पुणे : विधानसभा निवडणुकीचं गणित जुळवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या पुणे शहर प्रमुखांनी दहीहंडीच्या निमित्ताने रणशिंग फुंकलं आहे. भव्य दिव्य दहीहंडीचं आयोजन करून पुरात वाहून गेलेल्या कुटुंबातील महिलेला एक लाखाचा धनादेश जाहीर केला. त्यासोबत पीएमपीएल कर्मचाऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनाचं श्रेय नाना भानगिरी यांना देत पीएमपीएल कर्मचाऱ्यांनी त्यांच्या नावे ‘भावी आमदार’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे नाना भानगिरे यांच्या वतीने विधानसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकल्याचं चित्र दिसत आहे.

विकास कामांच्या भूमीपुजनावरुन यापूर्वी भाजप आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये वाद पेटला होता. युती धर्म फक्त शिवसेना आणि भाजपनेच पाळायचा का? असा खरमरीत सवाल उपस्थित करत वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर टीका करण्यात आली होती. मात्र आता श्रेय वादावरून पुन्हा महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
BJP leader joins Congress : भाजपला नाना पटोलेंचा पुन्हा धक्का, कल्याणमधील बडा मोहरा फोडला, रात्री उशिरा काँग्रेस प्रवेश
हडपसर विधानसभा मतदारसंघात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे विद्यमान आमदार आहेत. मात्र नाना भानगिरे यांनी जोरदार तयारी करत आपण निवडणूक लढवणार असल्याचा दावा या जागेवर केला आहे. त्यामुळे महायुती अंतर्गत वाद पेटण्याची शक्यता या मतदारसंघात सर्वाधिक असल्याचं वर्तवलं जात आहे.

पीएमपीएल कर्मचाऱ्यांचा विषय अर्थ खात्याकडे प्रलंबित असल्यामुळे अनेकदा नाना भानगिरे यांनी तीव्र आंदोलन सरकार विरोधात केलं आहे. मात्र त्यानंतर काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी मागण्या मान्य करून बदली कामगारांना कायमस्वरूपी रुजू करून घेतला आहे. याच यशाचं श्रेय कामगारांनी आज नाना भानगिरे यांना देत भावनिक झाले आहेत. त्यासोबत कामगारांनी भावी आमदार अश्या घोषणा दिल्या आहेत.
निलेश राणेंचा पोलिसांना दम, मला समजवू नका, आदित्य ठाकरेंना आधी बाहेर काढा, राजकोट किल्ल्यावर राडा
शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणारे नेते म्हणजे नाना भानगिरे. त्यांच्यासोबत पुण्यातले दिग्गज नेतेही शिंदे गटात गेले. एकनिष्ठ राहून आतापर्यंत नाना भानगिरेंनी अनेक कामं केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून हडपसर मतदारसंघाच्या विकासासाठी भरघोस निधीही आणला. मतदारसंघात पक्षबांधणी चांगल्या पद्धतीने केल्यामुळे भानगिरे हडपसर मतदारसंघात इच्छुक आहेत.

Source link

maharashtra assembly election 2024Maharashtra politicsPune newsVidhan Sabha Nivadnukएकनाथ शिंदे शिवसेनादहीहंडी २०२४नाना भानगिरेमहायुती जागावाटपहडपसर विधानसभा मतदारसंघ
Comments (0)
Add Comment