मोदी सरकारच्या विकासात दोष! छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरुन प्रियंका गांधींची थेट बोचरी टीका

मुंबई : समुद्रकिनारी नजीक असलेल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. घटनेमुळे राज्यातील शिवप्रेमींच्या प्रचंड रोषाला सरकारला जावे लागत आहे. अशातच आता केंद्रात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन वातावरण तापलेले आहे. साधारण आठ महिन्यापूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी पुतळ्याचे अनावरण केले होते. आठ महिन्यातच पुतळा पडल्याने प्रियंका गांधी यांनी थेट मोदींना भष्ट्राचारी म्हणत हल्लाबोल चढवला आहे. इतकेच नव्हे तर मोदींनी केलेल्या कामाचा आणि देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी केलेल्या कामाचा थेट पाढाच प्रियंका गांधी यांनी वाचला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, त्या पत्राची दखल घेतली असती तर…

काय म्हणाल्या प्रियंका गांधी ट्वीटमध्ये..

पंतप्रधानांनी मागील वर्षीच सिंधुदुर्गात जात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण केले होते. पण फक्त आठ महिन्यात पुतळा कोसळला आहे. अयोध्येचे मंदिर, उज्जैन महाकालमधील सप्तर्षींच्या मुर्ती, नवे संसदभवन, हायवे, पूल, रस्ते, मोठे बोगदे जे काही सरकारकडून बनवले जात आहे त्यामध्ये काही ना काही दोष आढळून येत आहे. पंडित नेहरु यांच्यावेळी सुद्धा भाकरा नांगल सारखी धरण उभारण्यात आली. हीराकुंड सारखे बांध उभारले गेले. IIT, IIM, AIIMS सारखी शैक्षणिक संस्थाने उभारण्यात आली. सर्वच्या सर्व अजूनही नीट आहेत आणि देशाच्या विकासात योगदान देत आहेत. पण भाजपने श्रद्धेच्या, महापुरुषांचा आणि देशाच्या नावावर भ्रष्टाचार केला त्याचे उत्तर द्यावे लागेल अशी भूमिका प्रियंका गांधी यांनी मांडली आहे.

छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीचे नेते मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आज पाहणी करण्यासाठी पोहोचले, त्याच्या काही मिनिटे आधीच खासदार नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र, माजी खासदार निलेश राणेही दाखल झाले होते. त्यावेळी ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि राणे समर्थक यांच्यात जोरदार राडा झाला. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने आंदोलनाला हिंसक वळण मिळालं. राजकोट किल्ल्यात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

Source link

maharashtra shivaji maharaj statue fallanShivaji Maharaj Statue Collapseछत्रपती शिवाजी महाराज पुतळापीएम नरेंद्र मोदीप्रियंका गांधीमालवण सिंधुदुर्गराजकोट किल्ला
Comments (0)
Add Comment