शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेवरून राज्य सरकार अॅक्शन मोडवर

मुंबई : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसल्या प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक बोलावली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह बांधकाम मंत्री आणि नौदलाचे अधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण प्रकार कसा घडला? यावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. तसेच विरोधकांनी देखील राज्य सरकारवर टीका केली आहे.

राणे – ठाकरे गटात राडा

राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची पाहणी करण्यासाठी भाजपचे नेते नारायण राणे आणि आदित्य ठाकरे हे किल्ल्यावर आले होते. यावेळी दोन्ही गटामध्ये तूफान राडा झाल्याचे पाहायला मिळाला. दोन्ही बाजूच्या समर्थकांनी घोषणाबाजी केल्यामुळे परिस्थिती चिखळली होती. महाविकास आघाडीचे नेते कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी पोहोचले होते. काही वेळातच स्थानिक खासदार नारायण राणे देखील किल्ल्यावर आले. त्यांच्यासोबत माजी खासदार निलेश राणे आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. नारायण राणे आणि काँग्रेस नेते, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यात संवाद झाला. दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन केलं. त्यानंतर राणे पुढे गेले. आदित्य ठाकरे यांचा देखील नियोजित करण्यात आला होता. दोन्ही नेत्यांच्या दौऱ्याची वेळ वेगवेगळी होती. परंतु आदित्य ठाकरे यांना किल्ल्यावर पोहोचण्यासाठी उशीर झाल्यामुळे राणे आणि ठाकरेंचे समर्थक आमने सामने आले आणि त्यानंतर राडा झाला.

मोदी,फडणवीसांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन उठाबशा काढाव्यात

प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, ” राजकोट किल्ल्यावरील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणि देवेंद्र फडणवीसांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन उठाबशा काढाव्यात,आधी त्यांनी उठाबशा काढाव्यात मग आम्ही काढू कारण आम्ही देखील सरकारचा भाग होतो.”

दरम्यान, या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत.

Source link

chhatrpati shivaji maharaj statuecm meetingEknath Shindeeknath shinde newsRajkot Fortएकनाथ शिंदेमालवणराजकोट किल्लाशिवाजी महाराज पुतळा विटंबना
Comments (0)
Add Comment