छत्रपतींचा पुतळा गडबडीत बसवला, निकृष्ट दर्जाचे सामान वापरले; खासदार शाहू महाराजांचा आरोप

कोल्हापूर, नयन यादवाड : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी महायुती सरकारच जबाबदार असल्याचा आरोप खासदार शाहू महाराज यांनी केला. याच प्रकरणात कामात हलगर्जीपणा झाल्याचे स्पष्ट झाले असून याला जबाबदार असणाऱ्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी शाहू महाराजांनी केली आहे. मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दोन दिवसापूर्वी अवघ्या आठ महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आलं होते. याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आता सर्वच स्तरातून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. आज महाविकास आघाडीच आंदोलन देखील राजकोटमध्ये पार पडले आहे. यानंतर छत्रपती घराण्याचे वंशज खासदार शाहू महाराज यांनी रात्री अचानक मालवण येथे भेट देऊन पुतळ्याची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी महाराज यांच्याशी संवाद साधत पुतळा घाई गडबडीत बसवल्यामुळेच कोसळल्याचा आरोप केला.
Malvan Bandh : शिवरायांचा पुतळा कोसळल्याचा निषेध, मालवण बंदची हाक, ७० ते ८० टक्के दुकानदार सहभागी

पत्रकारांशी बोलताना शाहू महाराज म्हणाले, पुतळा बसवताना योग्य ती काळजी घेतली गेली नाही. व्यवस्थित प्रक्रिया राबवली गेली नाही. गडबड करत पुतळा बसवला. पुतळ्यासाठी जे मटेरियल वापरले ते सुद्धा निकृष्ट दर्जाचे असल्याने तो पडला असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणाला महायुतीतील अनेक जण जबाबदार असून संबंधितावर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.यावेळी माजी नगरसेवक माणिक मंडलिक, हर्षल सुर्वे, श्रीधर गाडगीळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरुन सध्या राज्यात वातावरण पेटले आहे. आज राजकोट किल्ला येथे महाविकास आघाडीचे शिष्टमंडळाने भेट दिली, यामध्ये आदित्य ठाकरे, जयंत पाटील आणि विजय वड्डेटीवार यांचा समावेश होता. यावेळी स्थानिक खासदार नारायण राणे आणि त्यांचे पुत्र निलेश राणे यांनी महाविकास आघाडीला रोखण्याचा प्रयत्न केला. महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने भिडल्याचे चित्र दिसले. येत्या १ सप्टेंबरला महाविकास आघाडी गेटवे ऑफ इंडिया येथे सरकारविरोधात जोडेमारो आंदोलन करणार आहे.

Source link

kolhapur mp shahu maharajshivaji maharaj statue fallकाँग्रेस खासदार शाहू महाराज ऑन शिवाजी महाराजखासदार छत्रपती शाहू महाराजछत्रपती शिवाजी महाराज पुतळाराजकोट किल्लाशाहू महाराज कोल्हापूर गादीसिंधुदुर्ग छत्रपती शिवराय पुतळा
Comments (0)
Add Comment